महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुजरातमध्ये ट्रकची बसला धडक, 6 ठार

06:22 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

गुजरातमध्ये सोमवारी पहाटे एक भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. गुजरातच्या आणंदमध्ये अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती महामार्गावर एका ट्रकने बसला धडक दिली असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडक दिली होती.

Advertisement

आणंद जिल्ह्यातील चिखोदरा गावानजीक ही दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या दिशेने प्रवास करणारी एक खासगी बस रस्त्याच्या कडेला उभी होती, या बसचा टायर फुटला होता. टाय बदलण्याचे काम सुरू असल्याने अनेक प्रवासी खाली उतरले होते. काही प्रवासी बससमोर उभे असताना मागून एका भरधाव ट्रकने बसला धडक दिली. या दुर्घटनेत 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बसचालक देखील सामील आहे. तसेच तीन महिला आणि तीन पुरुष यांचा मृतांमध्ये समावेश असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. तर जखमींना  रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article