महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उसाने भरलेल्या ट्रॉलीला टेम्पोची धडक! टेम्पोचालक जागीच ठार

12:43 PM Jan 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
accident
Advertisement

पुलाची शिरोली / वार्ताहर

मालवाहतूक टेम्पोने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने टेम्पो चालक ठार झाला. भाऊसो नाना लोंढे ( वय ४३, रा. भडकंबे, ता. वाळवा, जी. सांगली ) असे मृताचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले. शुभम महादेव पोळ व ओंकार सर्जेराव माने ( दोघेही रा. नागाव, ता. वाळवा, जी. सांगली ) अशी जखमींची नावे आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बिरदेव मंदिर समोर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

Advertisement

याबाबत पोलीसांतून मिळालेली माहिती अशी , भाऊसो लोंढे हे आपले ताब्यातील टाटा ४०७ हा मालवाहतूक टेम्पो घेऊन शिरोली एमआयडीसीकडून पुण्याच्या दिशेने निघाले होते. शुभम पोळ व ओंकार माने हेही त्यांच्या टेम्पोतून प्रवास करत होते. सहा पदरीकरणासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूपट्ट्या उकरलेल्या असतानाही टेम्पोचालक लोंढे हे भरधाव वेगाने निघाले होते. टोप येथील बिरदेव मंदिर समोर त्यांच्या टेम्पोने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीस मागील बाजूस जोराची धडक दिली. या धडकेमध्ये भाऊसो लोंढे गंभीर जखमी झाले. शुभम पोळ व ओंकार माने हेही जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कोल्हापुर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र टेम्पो चालक भाऊसो नाना लोंढे हे मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची नोंद रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement

Advertisement
Next Article