For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ट्रायम्फ ट्रॅकर 400’ भारतीय बाजारात दाखल

06:05 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ट्रायम्फ ट्रॅकर 400’ भारतीय बाजारात दाखल
Advertisement

17 इंच अलॉय व्हील्ससह अन्य फिचर्स : 40 एचपी क्षमतेची शक्तीशाली दुचाकी

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ब्रिटिश प्रीमियम बाईक निर्माता ट्रायम्फने 6 एप्रिल रोजी भारतात आपली नवीन मोटरसायकल ट्रॅकर 400 लॉन्च केली आहे. कंपनीने भारतीय बाजारातील कर धोरणे लक्षात घेऊन ही बाईक खास डिझाइन केली आहे.

Advertisement

यात जुन्या 398 सीसी इंजिनऐवजी 40 एचपी शक्ती असलेले पूर्णपणे नवीन, लहान आकाराचे 349 सीसी इंजिन वापरले आहे. याची एक्स-शोरूम किंमत 2,46,000 आहे. ही स्पीड 400 पेक्षा 14,000 ने महाग आणि स्क्रॅम्बलर 400एक्स पेक्षा 14,000 ने स्वस्त आहे.

डिझाइन आणि लूक : फ्लॅट-ट्रॅक रेसिंगपासून प्रेरित स्टाईल डिझाइनच्या बाबतीत, ट्रायम्फ ट्रॅकर 400 इतर मॉडेल्सपेक्षा बरीच वेगळी दिसते. ही ‘फ्लॅट-ट्रॅक‘पासून प्रेरित रोड बाईक म्हणून डिझाइन केली गेली आहे.

बॉडी डिझाईन : यात बॉक्सच्या आकाराची फ्युएल टँक, छोटी फ्लायक्रीन आणि नंबर-बोर्ड स्टाईलचे साईड पॅनेल्स आहेत.

रंगांची उपलब्धता : कंपनीने ही बाईक तीन आकर्षक रंगांच्या संयोजनात उपलब्ध केली आहे. लाल आणि पांढरा, काळा आणि पिवळा, आणि लाल आणि काळा.

हार्डवेअर आणि टायर्स: नवीन 17-इंची अलॉय व्हील्स ट्रॅकर 400 चे वजन 181 किलो आहे, जे नवीन स्पीड 400 पेक्षा जवळपास 2 किलो जास्त आहे. रायडिंग आरामदायक करण्यासाठी यात प्रीमियम हार्डवेअरचा वापर केला आहे.

पॉवर: लहान इंजिन असूनही, ते 40 एचपीची कमाल पॉवर निर्माण करते.

गिअरबॉक्स: यामध्ये स्मूथ शिफ्टिंगसाठी 6-स्पीड गिअरबॉक्स आहे.

ट्रायम्फची प्रमुख

भारतीय लाइनअप

मॉडेल किंमत

(एक्स-शोरूम, दिल्ली)

ट्रायम्फ स्पीड 400

2.32 लाख

ट्रायम्फ ट्रॅकर 400

2.46 लाख

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स

2.60 लाख

Advertisement
Tags :

.