ट्रायम्फ स्पीड ट्टिन 1200 लाँच
किंमत 12 लाख रुपये : आधुनिक क्लासिक लूकसह सज्ज
नवी दिल्ली : ट्रायम्फ मोटरसायकल्स इंडियाने भारतीय बाजारात आपले नवीन अपडेट मॉडेल स्पीड ट्टिन 1200 दाखल केले आहे. कंपनीने अलीकडेच ही दुचाकी सादर केली होती. ही दुचाकी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याची सुरुवातीची किंमत ही 12.75 लाख रुपये आहे. गाडीच्या सुरक्षेसाठी कॉर्नरिंग एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह रोड आणि रेन रायडिंग मोड्स देण्यात आली आहेत. नव्या ट्रायम्फमध्ये आता स्पीडमास्टर स्टाईल एलईडी हेडलाइट्स, नवीन इंजिन केसिंग आणि सस्पेंशन आहेत. ज्यामध्ये आरएसयूएस आणि स्लिम डाउन एक्झॉस्ट मफलरऐवजी मागील बाजूस शॉक अॅब्सॉर्बर्स आहेत. सदरची गाडी तीन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये पांढरा, लाल आणि चांदी तर आरएस मध्ये दोन रंग राहणार आहेत. यात काळा आणि नारंगी पर्याय मिळणार आहे. स्विचगियर ट्रायडंटसारखा आहे. यात युएसबी सी चार्जिंग पोर्टसह अन्य अत्याधुनिक फिचर्स मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.