For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रायम्फ स्पीड टी4 केशरी रंगात सादर

07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
ट्रायम्फ स्पीड टी4 केशरी रंगात सादर
Advertisement

बाजा ऑरेंज असे गाडीचे नाव

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

ट्रायम्फ मोटारसायकल्स इंडियाने त्यांची रेट्रो-स्टाईल असलेली प्रीमियम मोटारसायकल ट्रायम्फ स्पीड टी4 नवीन रंग पर्यायांसह लाँच केली आहे. तिचे नाव ‘बाजा ऑरेंज’ आहे. नवीन रंगसंगतीमध्ये टाकीवर ड्युअल-टोन ऑरेंज आणि राखाडी फिनिश आहे. ट्रायम्फ स्पीड टी4 लाइनअपमध्ये असलेल्या इतर रंगसंगतींप्रमाणेच त्याचा लिव्हरी लेआउट आहे. नवीन रंगसंगतीसहच्या गाडीची किंमत 2.05 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक 398सीसी रिट्यून्ड पेट्रोल इंजिनसह येते. या नवीन रंगसंगतीच्या समावेशासह, ही बाईक आता 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, बाईकमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Advertisement

यामध्ये पहिल्यांदाच एकात्मिक एलसीडी क्रीन आहे. ही निओ-रेट्रो रोडस्टर रॉयल एनफील्ड क्रीम 411, गोरिल्ला 450, हार्ले डेव्हिडसन एक्स440, जावा 42 एफजे 350 शी स्पर्धा करते. ऑल-एलईडी लाइटिंग आणि 17-इंच अलॉय व्हील्ससह, नवीन ट्रायम्फ स्पीड टी4 कंपनीच्या स्पीड 400 मोटरसायकलवर आधारित आहे आणि आधुनिक-क्लासिक लूकसह कंपनीची भारतातील तिसरी 400सीसी बाईक आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्पीड 400 मध्ये काही सौंदर्यवर्धक बदलांसह ती लाँच करण्यात आली होती. स्पीड टी4 मध्ये नवीन ग्राफिक्ससह नवीन बार-अँड मिरर्ससह ऑल-एलईडी लाइटिंग देखील आहेत.

Advertisement
Tags :

.