महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘बृंदा’ सीरिजमध्ये तृषा कृष्णन

06:12 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2 ऑगस्टला होणार प्रदर्शित

Advertisement

तृषा कृष्णन ही दक्षिण भारतातील दिग्गज अभिनेत्री आहे. ती तमिळ, तेलगू आणि मल्याळी चित्रपटांमध्ये दिसून येते. तिने तमिळ चित्रपट सामी, गिल्ली आणि तेलगू चित्रपट वर्षमद्वारे यश मिळविले होते. यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. 2010 मध्ये तिने ‘खट्टा मीठा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, अलिकडेच ती लियो या चित्रपटात दिसून आली होती. तृषा आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

Advertisement

तृषा सध्या तेलगू चित्रपट ‘विश्वभंर’च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार चिरंजीवीसोबत दिसून येणार आहे. याचबरोबर ती ‘बृंदा’ या सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही एक मनोरंजक थ्रिलर सीरिज असुन यात ती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

तृषाची ही सीरिज सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे.  ही सीरिज 2 ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तेलगू, हिंदी, कन्नड, मल्याळी, तमिळ, मराठी आणि बंगाली भाषेत ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत इंद्रजीत सुकुमारन, जया प्रकाश, आमानी, रविंद्र विजय, आनंद सामी, राकेंदु मौली हे कलाकार दिसून येणार आहेत. तृषा याचबरोबर तमिळ चित्रपट ‘विदा मुयार्ची’ आणि ‘ठग लाइफ’मध्ये दिसून येईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article