For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंगापूर ओपनमध्ये त्रीसा-गायत्रीचे पॅकअप

06:26 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिंगापूर ओपनमध्ये  त्रीसा गायत्रीचे पॅकअप
Advertisement

वृत्तसंस्था/ बँकॉक

Advertisement

भारताच्या त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांना सिंगापूर ओपन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नामी मात्सुयामा व चिहारु शिडा जोडीने भारतीय जोडीचा 23-21, 21-11 असा पराभव केला. त्रीसा व गायत्रीच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले. 47 मिनिटे चाललेल्या या लढतीत भारतीय जोडीने सुरेख खेळ साकारला. पहिल्या गेममध्ये उभय खेळाडूंत चांगलीच चुरस पहायला मिळाली. एकेका गुणांसाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला, पण जापनीज जोडीने हा गेम 23-21 असा जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीकडून अनेक चुका झाल्या, याचा फायदा घेत जापनीज जोडीने हा गेम सहज जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह जपानच्या नामी व चिहारु जोडीने फेब्रुवारीत झालेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील पराभवाचा आपला बदला देखील चुकता केला. दरम्यान, त्रीसा व गायत्री यांच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान देखील समाप्त झाले आहे. याआधीच सिंधू, श्रीकांत, प्रणॉय व सात्विक-चिराग यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.