For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Triputi Ghat | फक्त जंगल नव्हे, नागरिकांची सुरक्षाही महत्त्वाची; 'या' गावात वन विभागाचा आदर्श उपक्रम

03:50 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
triputi ghat   फक्त जंगल नव्हे  नागरिकांची सुरक्षाही महत्त्वाची   या  गावात वन विभागाचा आदर्श उपक्रम
Advertisement

Advertisement

एकंबे : सातारा- म्हसवड-लातूर या अत्यंत वर्दळीच्या महामार्गावरील कोरेगाव तालुक्याच्या प्रवेशद्वाराजवळील त्रिपुटी खिंड अपघातांचे केंद्र बनत चालली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्या, झुडपे, वेली आणि गवतामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने वारंवार अपघात घडत होते. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत कोरेगाव वन विभागाने श्रमदानातून रस्ता स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला.

जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांनी स्वतः पुढाकार घेत वन कर्मचारी आणि हंगामी वनमजुरांसह श्रमदान केले. रस्त्यालगत वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे, झुडपे, गवत आणि वेली हटवून वाहनचालकांचा दृष्टीपथ मोकळा करण्यात आला.
या मोहिमेमुळे त्रिपुटी खिंडीतून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना समोरून येणारी वाहने स्पष्टपणेदिसू लागली असून अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. रस्त्याची सुरक्षितता वाढल्याने प्रवाशांनीही वन विभागाच्या या कार्याचे स्वागत केले आहे.

Advertisement

'फक्त जंगलांचे संरक्षण नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही आमचीच, हा संदेश या उपक्रमातून वन विभागाने कृतीतून दिला आहे. उर्वरित लवकरच स्वच्छतेचे कामही पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली. त्रिपुटी खिंडीत अपघातांची मालिका रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या लोकहिताच्या उपक्रमाबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे आणि त्यांच्या संपूर्ण पथकावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisement
Tags :

.