माधुरीसोबत झळकणार तृप्ती डिमरी
माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘मां बहन’ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात रवि किशनही दिसून येणार आहे. 4 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मां बहन’ची कहाणी रेखा नावाच्या एका महिलेच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. रेखाच्या घरात अचानक एक मृतदेह मिळाल्यावर तिचे जीवन बदलून जाते. रेखाला आता स्वत:च्या दोन मुली जया आणि सुषमासोबत मिळून या मृतदेहाच्या समस्येपासून मुक्तता मिळवायची असते असे यात दाखविण्यात येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी ‘तुम्हारी सुलु’ आणि ‘जलसा’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन पेले आहे. माधुरी आणि तृप्तीसोबत या चित्रपटात धारणा दुर्गा, रवि किशन, गीतांजली कुलकर्णी, अरुणोदय सिंह आणि शार्दुल भारद्वाज हे कलाकार दिसून येणार आहेत.
हा चित्रपट 4 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. माधुरी यापूर्वी मिसेज देशपांडे चित्रपटात दिसून आली होती. यातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. तर तृप्ती ही ‘ओ रोमियो’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यात तिच्यासोबत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता.