महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धनुषसोबत झळकणार तृप्ती

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आनंद एल राय यांचा चित्रपट

Advertisement

अॅनिमल या चित्रपटात काम केल्यावर नॅशनल क्रश ठरलेली अभिनेत्री तृप्ति डिमरी सातत्याने चर्चेत आहे. तिचा नवा चित्रपट ‘बॅड न्यूज’ 19 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. याचबरोबर तिच्याकडे अनेक नव्या चित्रपटांची रांग लागली आहे. याचदरम्यान ती आता धनुषसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय करणार आहेत. तर ‘तेरे इश्क में’ असे या चित्रपटाचे नाव असेल.

Advertisement

धनुष आणि आनंद एल. राय यांनी ‘रांझणा’ या हिट चित्रपटात एकत्र काम केले होते. धनुष स्वत:चे दाक्षिणात्य प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यात व्यग्र आहे, त्यानंतर तो ‘तेरे इश्क में’च्या चित्रिकरणात सहभागी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. वाराणसी समवेत उत्तरप्रदेशातील अनेक शहरांमध्ये हे चित्रिकरण पार पडणार आहे.

बॅड न्यूजनंतर तृप्तीचे आणखी अनेक चित्रपट प्रदर्शित होतील. ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या कालावधीत प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर ती राजकुमार राव सोबत ‘विकी विद्या का वो वाला वीडिओ’मध्ये देखील मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर अनुराग बासू यांच्या एका चित्रपटात ती दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article