For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : सातारारोडमध्ये पतीकडून 'तिहेरी तलाक'

04:19 PM Dec 07, 2025 IST | NEETA POTDAR
satara news   सातारारोडमध्ये पतीकडून  तिहेरी तलाक
Advertisement

                              सातारारोड परिसरात तिहेरी तलाक प्रकरण

Advertisement

एकंबे : सातारारोड परिसरातील २४ वर्षीय मुस्कान शोएब शिकलगार यांनी पती शोएब फय्याज शिकलगार (रा. शेरे स्टेशन, ता. कराड) याने 'तिहेरी तलाक' दिल्याचा आरोप करत कोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला आहे.

कोरेगाव पोलिसांकडून शनिवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १० वाजता फिर्यादी महिला घरात असताना पतीने मनीऑर्डरद्वारे ३ हजार रुपये पाठवले. ही रक्कम मिळाल्यानंतर मुस्कान यांनी पतीशी संपर्क साधला असता, 'ही इद्दतची रक्कम आहे. तुला तिहेरी तलाक देत आहे' असे पतीने सांगितल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

Advertisement

तक्रारीनुसार, पतीने यापुढे पती पत्नी म्हणून कोणतेही अधिकार लागू नसल्याचे सांगत दुसरे लग्न करण्याचा मानस व्यक्त केला.या धक्कादायक प्रकारानंतर मुस्कान यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणी मुस्लीम महिला (घटस्फोट हक्क संरक्षण) अधिनियम १९८६ अंतर्गत कलम ३ आणि ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारारोड पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस नाईक देवकी घाडगे करत आहेत.

Advertisement

.