For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri : गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यात तिहेरी अपघात; पादचालकाचा जागीच मृत्यू

03:30 PM Feb 20, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri   गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यात तिहेरी अपघात  पादचालकाचा जागीच मृत्यू
Advertisement

                           चहासाठी थांबलेल्या पर्यटकांच्या कारला मागून जोरदार धडक;

Advertisement

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यातील असुर्डे - बौद्धवाडी फाटा येथे गुरुवारी सकाळी तिहेरी अपघातात एका पादचा-याचा मृत्यू झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने दिलेल्या जोरदार धडकेत विजय बाबाराम सावर्डेकर (५५, रा. असुर्डे सावर्डेकरवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. चहासाठी रस्त्यालगतच्या स्टॉलवर थांबलेल्या पर्यकांच्या कारलाही पाठीमागून कारने जोरदार धडक दिली.

तसेच एका दुचाकीस्वारालाही ठोकरले. यात दोन्ही कार आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे . स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले. सावर्डे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता हा अपघात घडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.