For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बडेकोळ्ळमठ क्रॉसवर तिहेरी अपघात

06:54 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
बडेकोळ्ळमठ क्रॉसवर तिहेरी अपघात
Advertisement

सुदैवाने प्राणहानी नाही : महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ क्रॉसजवळ शुक्रवारी झालेल्या तिहेरी अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर काही काळ परिणाम झाला होता. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतुकीसाठी महामार्ग खुला केला.

दुभाजकाला ठोकरून एक कंटेनर उलटला. त्याचवेळी आणखी दोन आयशर वाहनांनाही अपघात झाला. या तिहेरी अपघातात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघातांची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

केवळ आठवडाभरात याच परिसरात पाचहून अधिक अपघात घडले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सतत होणारे अपघात लक्षात घेऊन वैज्ञानिकरित्या त्याचे विश्लेषण करवून घेतले होते. या परिसरात अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजनाही राबविल्या होत्या. तरीही अपघातांची मालिका सुरूच आहे.

Advertisement
Tags :

.