140 देश, 400 शहरांची ट्रिप, 3 वर्षांपर्यंत जहाजात वास्तव्य
चर्चेत क्रूज कंपनीची ही गोल्डन ऑफर
एका क्रूज लाइनने ‘गोल्डन पासपोर्ट’ सर्व्हिसची सुरुवात केली आहे. याच्या अंतर्गत निवृत्त लोकांना 3 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत 140 देशांची सागरी यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच क्रूजवर सवार लोक या देशांच्या 400 हून अधिक शहरांमध्ये फिरू शकतील. या गोल्डन पासपोर्टच्या गोल्डन ऑफरची मोठी चर्चा होत आहे. एंडलेस होराइजन्स, विला वी रेसिडेन्सकडून ‘समुद्रात आशियाना’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, जो अतिथींना क्रूज जहाजांच्या ताफ्यावर आजीवन राहण्याची सुविधा प्रदान करतो.
87 लाख खर्च करावे लागणार
याच्या अंतर्गत 99,999 डॉलर्स (87 लाख रुपये)पासून सुरू होणाऱ्या गोल्डन पासपोर्ट धारक अतिथींना 140 देशांच्या 400 हून अधिक शहरांसाठी सातत्याने प्रवास करण्याची संधी मिळेल. तसच प्रत्येक यात्रेचा कालावधी तीन ते साडेतीन वर्षांपर्यंत असेल. बहुतांश बंदर भ्रमण दोन ते 7 दिवसांपर्यंत असेल, ज्यामुळे अतिथींना जहाजाच्या डॉकवर उभे राहण्यादरम्यान स्थळाबद्दल माहिती मिळविण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
जहाजाच्या सर्वप्रकारच्या सुविध
अतिथींना क्रूजवर एका अशा लाइफस्टाइलची ऑफर दिली जाईल, ज्यात भोजन, क्लॉथ वॉशिंग, हाउसकीपिंग, मनोरंजनाचा समावेश असेल, तसेच भोजनासोबत वाइन किंवा बियरही सामील असेल. सेवाशुल्कही यात समील असेल. तिकीटधारकांना छुपे शुल्क आणि बंदर करांपासुन सूट दिली जाणार आहे. गोल्डन पासपोर्टसोबत अतिथींना मोफत वार्षिक चिकित्सा तपासणीचा अधिकार मिळणार आहे.
55-60 वयोगटाच्या लोकांना 2.5 कोटी रुपयांचे शुल्क
या कार्यक्रमाच्या अंतर्गत 99 हजार डॉलर्सचा पर्याय विशेषकरून 90 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी राखीव आहे. सर्वात महाग स्तर 2,99,999 डॉलर्सचा असून तो 55-60 या वयोगटातील लोकांसाठी आहे. लोक जेव्हा सेवानिवृत्त होतात, तेव्हा त्यांची सर्वात मोठी भीती स्वत:च्या कमाईपेक्षा अधिक काळार्पंत जिवंत राहण्याची असते, असे वक्तव्य विला वी रेसिडेंसचे संस्थापक माइक पीटरसन यांनी केले आहे.
जग फिरण्याची संधी
जीवन वेगाने पुढे जाते आणि बहुतांश लोकांना जगाची सैर करण्याची संधी असूनही ती केली नसल्याचे खंत असते. गोल्डन पासपोर्ट त्या सत्याला शक्य करणार असल्याचा दावा विला वी रेसिडेंसच्या सीईओ कॅथी विलाल्बा यांनी केला आहे.