For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तृणमूलच्या मिमी चक्रवर्ती यांचा राजीनामा

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
तृणमूलच्या मिमी चक्रवर्ती यांचा राजीनामा
Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा झटका

Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या मतदारसंघातील स्थानिक पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिमी चक्रवर्ती यांनी जाधवपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मिमी चक्रवर्ती यांनी यापूर्वी 2022 सालीही ममता बॅनर्जी यांच्याकडे खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता, पण त्यावेळी त्यांनी तो फेटाळला होता. आताही त्यांनी आपल्या मुद्द्यांबाबत पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, द्वयींमध्ये सविस्तर चर्चा झालेली नाही. तरीही ममता बॅनर्जी यांच्या सल्ल्यानुसारच आपण पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.