महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तृणमूलची तयारी

06:31 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर आता अनेक राज्यांमध्ये विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तारीखही जाहीर केली आहे. 10 जुलै रोजी 7 राज्यांमधील 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. यात पश्चिम बंगालमधील 4 मतदारसंघ सामील आहेत. यात रायगंज,  रानाघाट-दक्षिण, मनिकतला आणि बागदाह यांचा समावेश आहे.

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने रायगंज विधानसभा मतदारसंघात कृष्णा कल्याणी यांना उमेदवारी दिली आहे. तर रानाघाट-दक्षिण मतदारसंघात मुकुटमणि अधिकारी हे तृणमूलचे उमेदवार असतील. मतुआबहुल बागदाह मतदारसंघात मधुपूर्णा ठाकूर यांना तृणमूलने संधी दिली आहे. तृणमूल काँग्रेसकडून मनिकतला मतदारसंघात सुप्ति पांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

तीन आमदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने तर एका आमदाराचे निधन झाल्याने पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची ही पोटनिवडणूक हेत आहे. रायगंज, रानाघाट-दक्षिण आणि बागदाह मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. यामुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर मनिकतला मतदारसंघाचे आमदार साधन पांडे यांचे निधन झाले आहे. या मतदारसंघात आता त्यांच्या पत्नीला तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article