For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हल्ला झाल्याचा तृणमूल खासदाराचा दावा

06:34 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
हल्ला झाल्याचा तृणमूल खासदाराचा दावा
Advertisement

विरोधात निदर्शने, चोर-चोर अशा घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ हुगळी

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळीत कथित स्वरुपात हल्ला झाला आहे. कल्याण बॅनर्जी हे तृणमूल कार्यकर्त्यांच्या मुक्ततेसाठी निवेदन देण्यासाठी जात असताना हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कल्याण बॅनर्जी हे हुगळीतील चंडीतला पोलीस स्थानकात एका प्रतिनिधिमंडळासोबत पोहोचले होते, याचदरम्न त्यांना विरोध सुरू झाला आणि निदर्शकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.

Advertisement

याचदरम्यान कथित स्वरुपात त्यांच्यावर हल्ला झाला आहे. या कथित घटनेनंतर कल्याण बॅनर्जी हे समर्थकांसह धरणे आंदोलनाला बसले. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत स्थितीवर नियंत्रण मिळविले.

मी एकटाच जात होतो, माझ्यासोबत कुणीच नव्हते. भाजप सदस्यांनी मला शिविगाळ केली आणि माझ्यावर डोक्यावर बॉल मारला. माझ्या डोक्यातून रक्त वाहत होते. आता खरं कोण अन् खोटं कोण हे लोकच ठरवतील असा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे.

केवळ ड्रामा करत आहेत!

कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालेला नाही तसेच ते जखमी देखील झालेला नाहीत. कल्याण बॅनर्जी केवळ ड्रामा करत आहेत, अभिषेक बॅनर्जी प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूल खासदाराने पुढील वर्षी स्वत:चा ड्रामा चांगल्याप्रकारे करावा. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारले म्हणणारे बॅनर्जी त्वरित नाट्यामय पद्धतीने जमिनीवर आडवे होतात, परंतु त्यांचा फोन सुरूच असतो अशी टीका भाजप नेते देवजीत सरकार यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.