TMC Office Demolished कोलकात्यातील तृणमुल काँग्रेसचे कार्यालय पाडले...सुवेंदु अधिकारी सरकारची मोठी कारवाई
07:45 PM May 23, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मागील तृणमूल काँग्रेस सरकारचे अनेक निर्णय रद्द केले असले तरी, प्रत्यक्ष कारवाई सुरूच आहे. शनिवारी, कोलकातामधील तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) कार्यालयावर बुलडोझरने कारवई करण्यात आली. कोलकाताच्या बेलेघाटा भागातील टीएमसीचे कार्यालय बुलडोझरने पाडण्यात आले. हे कार्यालय बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे.
Advertisement
बुलडोझर कारवाईदरम्यान अशी माहिती समोर आली की, कोलकाताच्या बेलेघाटा परिसरात पाडण्यात आलेले टीएमसीचे कार्यालय एका खाजगी व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीवर बांधण्यात आले होते. ते बेकायदेशीरपणे बांधण्यात आले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीरपणे बांधलेले टीएमसी पक्षाचे कार्यालय बुलडोझरने पाडण्यात आले. टीएमसीने बेलेघाटा विधानसभा जागा जिंकली होती.
Advertisement
Advertisement