For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

West Bengal Election Controversy बहुसंख्य मुस्लिम मतदारसंघात ९७% मते भाजपला?...तृणमुल काँग्रेसचा निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप

02:27 PM May 23, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
west bengal election controversy  बहुसंख्य मुस्लिम मतदारसंघात ९७  मते भाजपला    तृणमुल काँग्रेसचा निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप
Advertisement

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. असे असले तरी विरोधी तृणमुल काँग्रेस पक्षाने निवडणूकीच्या प्रक्रियेवर प्रथमपासून प्रश्नचिह्न उभे केले होते. भारतीय जनता पार्टीने निवडणुकांमध्ये गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप तृणमुल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला आणि सर्वोच्च न्यायालयाता या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Advertisement

२० मतदारसंघात चुरशीची लढत

बंगाल निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला असला तरी, लढत निःसंशयपणे तीव्र होती. जवळपास २० मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली, ज्यात विजयाचे अंतर ५,००० पेक्षा कमी मतांचे होते. विशेष म्हणजे राजारहाट न्यू टाऊन मतदारसंघातील निवडणूक सर्वात अटीतटीची होती, कारण या भागात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. इथल्या मतदारांनी भाजपला पक्षाला मोठ्या संख्येने मतदान केल्यामुळे निकाल भाजपच्या बाजूने लागला. या गोष्टीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Advertisement

स्क्रोलच्या वृत्तानुसार, ५ मे रोजी मतमोजणीची अतिरिक्त फेरी झाल्यानंतर भाजपला त्या मतदान केंद्रात अभूतपूर्व ९७% मते मिळाली आणि त्यांनी तृणमूल काँग्रेसची (TMC) आघाडीचा पराभव केला.

भाजपचे पियुष कनोडिया विजयी

राजारहाट न्यू टाऊनच्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे पियुष कनोडिया यांनी तृणमूलचे तापश चॅटर्जी यांचा ३१६ मतांच्या अगदी कमी फरकाने पराभव केला. एकूणच, भाजपने २०७ जागा जिंकल्या. राजारहाटमधील या नाट्यमय घडामोडीमुळे, यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणुकीच्या निकालांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी, या निकालांवरून निवडणुकांमध्ये पक्षपात केल्याचा आरोप केला.

सागरिका घोष यांचा आरोप काय?

"निवडणूक आयोग, वनीश कुमार आणि सर्वोच्च न्यायालय कुठे आहेत? राजारहाट-न्यू टाऊनमध्ये टीएमसीचा विजय स्थिर होता, पण अंतिम फेरीत एका मुस्लिमबहुल मतदान केंद्राची मतमोजणी चुकीच्या क्रमाने झाली आणि तेथील ९७% मते भाजपला मिळाली," असे ट्विट घोष यांनी केले. "वनीश कुमार" हा उल्लेख मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर केलेला टोला असल्याचे मानले जाते, ज्यांचे निवडणुकीच्या काळात टीएमसीसोबत अनेकदा खटके उडाले आहेत.

EVM मध्ये फेरफार केल्याचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही यावर आपले मत व्यक्त केले असून, 'ईव्हीएममध्ये फेरफार' झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. "मुस्लिमबहुल मतदान केंद्रावर भाजपला ९७% मते मिळणे, हा ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा, ईव्हीएम बदलल्याचा किंवा निवडणूक आयोगाच्या निवडणूक अधिकाऱ्याने ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांपेक्षा पूर्णपणे वेगळी मते जाहीर केल्याचा स्पष्ट पुरावा आहे," असे भूषण यांनी लिहिले.

बहुसंख्य मुस्लिम मतदार

या खुलाशामुळे मतमोजणी प्रक्रियाच प्रश्नचिन्हात आली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी उत्तर कोलकात्यातील राजारहाट न्यू टाऊनमधील मुसलमान पाडा येथील बूथ क्रमांक १६४ आहे, जिथे २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. बूथ क्रमांक १६५ देखील याच परिसराचा भाग आहे. नावाप्रमाणेच, मुसलमान पाडा येथील बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम आहे.

मुसलमान पाडा येथील दोन मतदान केंद्रांवरील मतदारांनी एकाच मतदान केंद्रावर (जगदीशपूर शाळा) मतदान केले. आता, स्क्रोलच्या विश्लेषणानुसार, ४ मे रोजी मतमोजणीच्या नवव्या फेरीत मतदान केंद्र क्रमांक १६४ कथितरित्या वगळण्यात आले.

राजारहाट मतदारसंघात अभूतपुर्व निकाल 

राजारहाट मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या पार पडल्या. ४ मे रोजी मतमोजणीच्या १७ फेऱ्या झाल्या होत्या. मध्यरात्रीपर्यंत, तृणमूल काँग्रेसचे तापश चॅटर्जी हे भाजपचे कानोडिया यांच्यापेक्षा ३१६ मतांनी आघाडीवर होते.

४ मे रोजी कथितरित्या वगळण्यात आलेले बूथ क्रमांक १६४, दुसऱ्या दिवशी (५ मे) १८ व्या आणि अंतिम फेरीत स्वतंत्रपणे मोजण्यात आले. मोजणीसाठी फक्त तेच एक बूथ शिल्लक होते. हे निकाल केवळ धक्कादायकच नव्हते, तर त्यांनी भाजपच्या बाजूने संपूर्ण चित्रच पालटून टाकले.

Advertisement
Tags :

.