For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यसभेसाठी तृणमूलचे चार उमेदवार जाहीर

06:24 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यसभेसाठी तृणमूलचे चार उमेदवार जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी बंगालमधील चार जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने मंत्री बाबुल सुप्रियो, पश्चिम बंगालचे माजी डीजीपी राजीव कुमार, वकील मेनका गुरुस्वामी आणि अभिनेत्री कोयल मलिक यांना उमेदवारी दिली आहे. सध्या बंगालमधील चारही राज्यसभेच्या जागा तृणमूलकडे आहेत. मौसम नूर काँग्रेसमध्ये सामील झाल्या आहेत. इतर तीन विद्यमान खासदारांमध्ये सुब्रत बक्षी, ऋतब्रत बॅनर्जी आणि साकेत गोखले यांचा समावेश आहे. पक्षाने त्यापैकी कोणालाही पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2026 आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी झाल्यानंतर 9 मार्चपर्यंत माघारीची मुदत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.