Cultural Kolhapur : पी ढबाक्..चा नाद अन् टेंबलाईची जत्रा, काय आहे कोल्हापूरची परंपरा?
कोल्हापुरात आषाढ महिन्यात प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हा सामूहिक विधी असतो.
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : पहाटे बरोबर चार वाजता गल्लीच्या तोंडाजवळ, चौकात, किंवा तालमीच्या दारात पिपाणी ढोलगे हलगीचा कडकडाट सुरू होतो. एवढ्या पहाटे हा कडकडाट कशासाठी? तर या परिसरातल्या सर्वांनी आज पहाटे लवकर उठावे, आणि होतेही तसेच सारी गल्ली लगबगीने उठते.
पूजा नैवेद्याच्या तयारीला लागते, तरुण मंडळी टेम्पोतून पंचगंगा नदीवर जातात. १५-२० घागरी भरून पंचगंगेचे पाणी गल्लीत आणतात. त्यानंतर पंचगंगेच्या या पाण्याची सामूहिक पूजा होते आणि सारी गल्ली एकत्र होऊन हे पाणी वाजत गाजत टेंबलाबाई देवीला जाऊन अर्पण करते.
कोल्हापुरात आषाढ महिन्यात प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हा सामूहिक विधी असतो. या विधीला गल्ली जत्रा असे म्हणतात आणि तालमी दिल्ली सोडाच, पण कोल्हापुरातील टीए बटालियनचे जवान, कोल्हापूर पोलीस दलातील सर्व कुटुंबीयही या सोहळ्यात सहभागी होतात.
मिरवणुकीत पोलीस, जवान ही गुलालाने मनसोक्त रंगून जातात आणि शहरातली तरुण मंडळी तर या दिवसाची वाट पाहत असतात. कोल्हापुरातील गल्ली गल्लीत हा सोहळा उत्साहाने साजरा होतो. यात धार्मिक भाग जरुर आहे, पण या सोहळ्यामागे पाण्याचा पूजन हा महत्त्वाचा भाग आहे. पावसाला ज्येष्ठ आषाढात सुरुवात होते.
नवी किंवा पाणवठ्यावर पाण्याची पातळी वाढते आणि हे नवे पाणी देवीच्या उंबऱ्यावर ठेवून त्याची पूजा केली जाते. वर्षभर शेती भाती व पिण्यासाठी पाणी आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने गल्लीची एकजूट दिसून येते. गल्लीतल्या प्रत्येक घरातील लहानापासून मोठ्यापर्यंतच्या सर्वांचा या सोहळ्यात सहभाग असणार हे ठरूनच गेलेले असते.
आषाढ महिन्यातील प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हा सोहळा साजरा होतो. सोहळ्यासाठी विविध समित्या तयार केल्या जातात. त्यात पाणी पूजन, मिरवणूक रात्री बकऱ्याच्या मटणाचा घरोघरी पोहोचवला जाणारा वाटा, शाकाहारी कुटुंबांना वेगळा काहीतरी प्रसाव ही कामे वाटून घेतली जातात.
नोकरीवरचे लोक तर या दिवशी हमखास रजा काढतात आणि त्यांचे व्यवस्थापकही गल्ली जत्रेची रजा म्हटल्यावर हमखास मंजूर करतात. या सोहळ्यात पोलीस बंदोबस्त म्हणून नव्हे आधार ठरणाऱ्या पाण्याचे सार्वजनिक पूजन किंवा पाण्याबद्दलची कृतज्ञताच या निमित्ताने कोल्हापुरात व्यक्त केली जाते.
कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक परंपरेत पंचगंगेच्या पाणी पुजण्याच्या सोहळ्याला खूप मानाचे स्थान तर सोहळ्याचा एक घटक म्हणून सहभागी होतात. पोलीस तर एका सजवलेल्या पालखीतून पंचगंगेचे पाणी आणतात. टेंबलाबाई टेकडीवरच्या टीए बटालियनचे जवान ही बटालियनच्या वाद्य वृंवासह या सोहळ्यात सहभागी होतात.
तेही पालखीतूनच पंचगंगेचे पाणी आणतात व पाण्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. गल्ली गल्लीत तर हा विवस म्हणजे वणकाच असतो. सोहळ्याच्या मिरवणुकीत बेभान होऊन तरुण सहभागी होतात. काहीजण नक्की अतिरेक करतात. डॉल्बी लावतात.
या काळात मिरवणुकीत एखावा छत्री घेऊन आला तर त्याला छत्री मिटवायला लावतात आणि पावसात चिंब भिजवतात. सोहळ्याचा विवस असा मिरवणुकांमुळे वणाणून निघतो आणि रात्री त्याहीपेक्षा प्रत्येक गल्लीत 'वेगळे' वातावरण असते. प्रत्येकाच्या घरात मांसाहारी जेवणाचा बेत असतो.
पाहुण्यांना त्यासाठी निमंत्रित केलेले असते. आता आषाढ महिन्यात प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी प्रत्येक गल्लीत हा सोहळा कधी करायचा याचे नियोजन झाले आहे. सोहळ्यासाठी प्रत्येक कुटुंबाने किती रुपये वर्गणी द्यायची तेही ठरले आहे. कोल्हापूरकरांनी ही परंपरा बवलत्या काळातही जपली आहे.
पोलिसांची पालखी
टेंबलाबाई देवीस पाणी वाहण्यासाठी पोलीस व त्यांचे कुटुंबीय मिरवणुकीने येतात. पोलिसांची वेगळी पालखी असते. पोलीस हेडक्वार्टरमध्ये वर्षभर ही पालखी एका खोलीत ठेवली जाते. पालखी उचलण्याचा मान जिल्हा पोलीस प्रमुखांचा असतो.
परंपरा कायम...
"टेंबलाबाई देवीला पंचगंगेचे पाणी वाहण्याचा हा सोहळा धार्मिक व सामाजिक अंगानेही महत्त्वाचे आहे. या सोहळ्याची पारंपारिकता बदलत्या काळातही कोल्हापूरकरांनी जपली आहे."
- प्रदीप गुरव, टेंबलाबाई देवी पुजारी