For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Trimbakeshwar Temple Nashik नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक अमृतकुंडाची स्वच्छता सुरु

04:39 PM Jul 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
trimbakeshwar temple nashik नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक अमृतकुंडाची स्वच्छता सुरु
Advertisement

 बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक येथील श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात असलेल्या ऐतिहासिक अमृतकुंडाची स्वच्छता सध्या सुरू आहे. ही स्वच्छता भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत सुरू आहे. आता ही स्वच्छता केल्यानंतर कुंडाच्या तळाशी असलेल्या शिवपिंडीचे दर्शन घडले.

Advertisement

संवर्धनाच्या कामाचा भाग म्हणून भारतीय पुरातत्त्व विभागाने अमृतकुंडातील संपूर्ण पाणी उपसून कुंडाची स्वच्छता केली. त्यानंतर तळाशी असलेले छोटे शिवलिंग स्पष्टपणे दिसून आले. यावेळी भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी कृष्णमूर्ती व त्यांचे सहकारी तसेच श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले उपस्थित होते.

इतिहासाच्या दृष्टीने महत्त्व असलेले अमृतकुंड हे पेशवेकाळात श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी दगडी बांधकामातून उभारण्यात आले असल्याचे सांगितले जाते.

Advertisement

सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना प्रवेशबंदी

सुमारे ६५ फूट खोल असलेल्या या कुंडातील पाणी भगवान त्र्यंबकेश्वरांच्या नित्यपूजा व अभिषेकासाठी वापरले जाते. कुंडाची रचना अत्यंत कलात्मक असून त्यामध्ये उतरता यावे यासाठी दगडी पायऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमृतकुंडात भाविकांना प्रवेश दिला जात नाही.

६५ फूट तीर्थकुंड

प्राचीन वास्तुशास्त्रानुसार मंदिर जितके उंच, तितक्याच खोलीचे तीर्थकुंड असावे, अशी संकल्पना मानली जाते. श्री त्र्यंबकेश्वर मंदिराची उंची सुमारे ६५ फूट असल्याने त्याच प्रमाणात अमृतकुंडाची खोली ठेवण्यात आल्याचे मानले जाते. दरवर्षी पावसाळ्यात अमृतकुंड पाण्याने भरते. विशेषतः मुसळधार पाऊस झाल्यास हे कुंड पूर्ण क्षमतेने भरत असून त्यातील पाणी वर्षभर धार्मिक विधींसाठी उपयोगात आणले जाते.

Advertisement
Tags :

.