For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना उद्या अभिवादन

07:45 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना उद्या अभिवादन
Advertisement

बेळगाव : 1 जून 1986 साली कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सोमवार दि. 1 जून 2026 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकजवळ अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.

Advertisement

सीमाभागात 1986 साली वाढती कन्नडसक्ती विरोधात मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष होता. आणि याचाच परिणाम म्हणून 1 जून 1986 रोजी या कन्नडसक्ती विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनावेळी कर्नाटक सरकारच्या पोलिसांच्या बेछूट गोळीबारात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.