For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बार असोसिएशनच्यावतीने दिवंगत वकिलांना श्रद्धांजली

10:28 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बार असोसिएशनच्यावतीने दिवंगत वकिलांना श्रद्धांजली
Advertisement

बेळगाव : गेल्या दोन वर्षांमध्ये विविध वकिलांचे निधन झाले आहे. त्या निधन झालेल्या वकिलांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, उपाध्यक्ष व जनरल सेक्रेटरी उपस्थित होते. जुन्या बार असोसिएशनच्या सभागृहात शोकसभा पार पडली. अॅड. एम. ए. हवालदार, अॅड. एन. डी. कुन्नी, अॅड. एम. एन. वस्त्रद, अॅड. बजंत्री उर्फ नागरे परशुराम एच., अॅड. एम. के. प्रभाकर, अॅड. ए. ए. बोगार, अॅड. डी. एन. उज्जीनकोप्प, अॅड. परशुराम जोतिबा नाईक, अॅड. अलोक व्ही. बेल्लद, अॅड. सुरेश एन. पत्तार यांचे निधन झाले आहे. या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर दिवगंत वकिलांची माहिती दिली. त्यानंतर ज्येष्ठ वकील एस. बी. शेख यांनी दिवंगत वकिलांच्या कार्याची माहिती दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.