For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅप्टन गावडे यांचे व्यक्तिमत्व आजही सर्वांसाठी प्रेरणादायी- दीपक भोगटे

03:49 PM Dec 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कॅप्टन गावडे यांचे व्यक्तिमत्व आजही सर्वांसाठी प्रेरणादायी  दीपक भोगटे
Advertisement

कॅप्टन गावडे यांना १०० व्या वाढदिवसानिमित्त
कट्टा येथे आदरांजली

Advertisement

चौके/ प्रतिनिधी

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे नांदोस चौके पंचक्रोशीतील समाजसेवक कॅप्टन रामकृष्ण गावडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कॅप्टन गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.दीपक भोगटे यांनी कॅप्टन गावडे यांच्या समग्र जीवनप्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले लहानपणापासून रामकृष्ण गावडे देशप्रेमी असल्याने ते भारतीय सैन्यात दाखल झाले. २८ वर्षे सैन्यात सेवा बजावली. १९६२ चीन विरुद्धच्या लढाईत त्यांनी अतुलनीय पराक्रम केला. त्यामुळे त्यांना कॅप्टन ही पदवी बहाल करण्यात आली. लष्करी सेवेत असतानाही त्यांचे आपल्या जन्मगावी लक्ष होते. अनेकांना त्यांनी सैन्यात जाण्यासाठी उद्युत केले. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी सामाजिक कार्यात झोकून दिले. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. सातत्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. सैनिक पतसंस्थेत १५ वर्षे संचालक म्हणून काम केले व अनेकांना रोजगार मिळवून दिला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून बॅ. नाथ पै सेवांगणने त्यांना बापूभाई शिरोडकर आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता."गरजूंना मदत करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल" असे त्यांनी सांगितले. किशोर शिरोडकर यांनीही कॅप्टन गावडे यांच्या काही आठवणी सांगितल्या. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.बाळकृष्ण नांदोसकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कॅप्टन गावडे सेवांगणच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असायचे.त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व जवळून
पाहता आले. त्यांच्या पवित्र स्मृतीनामी विनम्र अभिवादन करतो.

Advertisement

उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शोभा म्हाडगुत, अर्चना धुत्रे, डगरे मॅडम, दीपक भोगटे, मंगल पराडकर, मनोज काळसेकर, श्रीधर गोंधळी, बाळकृष्ण नांदोसकर, कट्टा दशक्रोशीतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.