Ajit Pawar : शरद पवारांच्या आजोळी कोल्हापूरच्या गोलिवडेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या आजोळी शोकसभा
कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच काल बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला..त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.. दरम्यान शरद पवारांच्या आजोळी म्हणजे कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावात देखील शोकाकुल वातावरण झालं आहे..अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावानं हळहळ व्यक्त केली..
शिवाय दिवसभर गाव बंद ठेवून गावकऱ्यांनी सायंकाळी शोकसभा घेतली.आणि नातवाप्रती अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली..तसेच तीन दिवस गावात दुखवटा जाहीर करण्यात आल्याने कोणतेही कार्यक्रम गावात होणार नाही..काही वर्षापूर्वी शरद पवारांनी आपल्या आजोळी गोलिवडे गावाला भेट दिली होती.
त्यानंतर गावात प्राथमिक शाळा इमारतीच्या उभारणीसह विकासासाठी भरगोस निधी दिला होता. त्यानंतर अजित पवारांनी देखील गावाला भेट देणार असल्याचं सांगितले होते. मात्र त्यांच्या अपघाती निधनाने काकांच्या आजोळी गोलिवडे गावाला यायचं त्यांच स्वप्न अपूर्ण राहिल्याच्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.तर पवार कुटुंबीयांच्या दु:खात गोलिवडे ग्रामस्थ सहभागी असून लवकरच अजित पवारांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेट घेतला घेणार असल्याचं गावकऱ्यांनी यावेळी सांगितलं.