For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रामाणिक सेवा बजावलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांचा गौरव

11:12 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रामाणिक सेवा बजावलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांचा गौरव
Advertisement

गैरहजर न राहता दिले कर्तव्याला महत्त्व : परिवहनकडून दखल

Advertisement

बेळगाव : परिवहनतर्फे बेळगाव विभागात प्रामाणिक आणि सर्वाधिक हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. जानेवारी 2024 ते मे 2024 दरम्यान सेवेवर सर्वाधिक हजेरी लावलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शक्ती योजनेमुळे परिवहन मंडळावर अतिरिक्त ताण वाढला आहे.अशा बिकट परिस्थितीत परिवहनमधील कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये बस चालक, बस वाहक आणि तांत्रिक कर्मचारी अशा बारा कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

परिवहनच्या ताफ्यातील बस चालक, वाहक आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उत्तम वाहतूक व्यवस्थेसाठी ताफ्यातील बस चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी गैरहजर न राहता सेवा बजावली आहे. याची दखल परिवहनने घेतली आहे. शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त ताण बससेवेवर वाढला आहे.अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनकडून प्रयत्न सुरू आहेत. याला कर्मचाऱ्यांनीही उत्तम साथ दिली आहे.कर्मचाऱ्यांनी आदर्श सेवेचा अवलंब करून कर्तव्य बजावावे.बस चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी गैरहजर न राहता सुरळीत कामकाज करावे. त्यामुळे परिवहन आणि प्रवाशांनाही सुलभ बससेवा मिळेल, अशी अपेक्षा वरिष्ठ विभागीय नियंत्रक राजेश हुद्दार यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.