महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रंगकर्मी दीनानाथ देसाई, सुमती देसाई यांचा सत्कार

12:09 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रंगभूमी दिनानिमित्त सम्राट क्लब बाळ्ळी महालतर्फे कुलवाडा, कुंकळ्ळी येथे कार्यक्रम

Advertisement

कुंकळ्ळी : सम्राट क्लब बाळळी महालतर्फे कुलवाडा, कुंकळ्ळी येथील ज्येष्ठ रंगकर्मी दीनानाथ देसाई व त्यांच्या पत्नी सुमती देसाई यांचा नुकताच रंगभूमी दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. एकेकाळी हौशी रंगभूमी गाजविलेल्या दीनानाथ देसाई यांचा चंद्रभागा तुकोबा नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार कोप्रे देसाई यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार कमलाक्ष प्रभुगावकर, पत्रकार सुनील फातर्पेकर व सम्राट क्लब बाळळी महालच्या अध्यक्ष मंदिरा फळदेसाई उपस्थित होत्या. सुमती देसाई यांचा निवृत्त शिक्षिका रेणुका फळदेसाई, निवेदिता फळदेसाई आणि मेधा फळदेसाई यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कोप्रे देसाई यांनी सांगितले की, दीनानाथ देसाई यांनी नाट्याकलेच्या हौसेपायी स्वत:चा वेळ व धन खर्च करून रंगमंचावर विविध भूमिका सादर केल्या आणि नाट्यारसिकांकडून वाहवा मिळविली. भारदस्त आवाज व वैशिष्ट्यापूर्ण लकब असलेले कलाकार म्हणून ते गाजले. केवळ दहा वर्षांचे असताना रंगमंचावर पाय ठेवण्याचे धाडस त्यांनी दाखविले होते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

देसाई यांनी हौशी रंगभूमीवरील अनेक ऐतिहासिक, पौराणिक, संगीत व सामाजिक नाटकांत विविध भूमिका साकारल्या. कुंकळ्ळी, मडगाव, वास्को, बाळ्ळी, फातर्पा, म्हापसा, मडकई व इतर ठिकाणी त्यांनी रंगमंच गाजविला. पाणीग्रहण, मथुरेचा राजा, करीन ती पूर्व, नेकजात मराठा, खुनाला वाचा फुटली, वनवास, अर्ध्या वाटेवर, रायगडाला जेव्हा जाग येते, सरनोबत, थँक्यू मिस्टर ग्लाड, मत्स्यगंधा, स्वयंवर, नटसम्राट अशा गाजलेल्या नाटकांत त्यांनी भूमिका करून एक वेगळी ओळख निर्माण केली, असे कोप्रे देसाई म्हणाले. यावेळी संदीप देसाई, अजय देसाई यांनी दीनानाथ देसाई यांच्या आठवणांना उजाळा दिला. या सत्काराबद्दल त्यांनी सम्राट क्लबचे आभार मानले. सत्काराला उत्तर देताना दीनानाथ देसाई यांनी आपण नाट्याकलेत दिलेल्या योगदानाची सम्राट क्लबने दखल घेतली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या घरी येऊन केलेला हा सन्मान खूप मोलाचा असल्याचे देसाई म्हणाले. यावेळी तपवीर फळदेसाई यांनी रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगितले. मंदिरा फळदेसाई यांनी स्वागत केले. दत्तराज फळदेसाई यांनी आभार मानले. यावेळी साईश फळदेसाई, साहील बुक्कम हेही उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article