For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाऊसाहेब बांदोडकरांना राज्यभरात आदरांजली

11:51 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाऊसाहेब बांदोडकरांना राज्यभरात आदरांजली
Advertisement

गोवा भाऊसाहेबांचे योगदान विसरणार नाही : भाऊसाहेबांचे कार्यही भावी पिढीसाठी प्रेरणादायक

Advertisement

पणजी : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भाग्यविधाते दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती काल मंगळवारी राज्यात सर्वत्र साजरी करण्यात आली. मिरामार येथील भाऊंच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर नेतेमंडळांनी पुष्पांजली अर्पण केली. नंतर त्यांनी जुन्या सचिवालयाजवळील भाऊंच्या पुतळ्dयास पुष्पहार घालून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, अत्याधुनिक आणि विकसित गोव्याची पायाभरणी भाऊंनी केली. त्यांनी गोव्यासाठी केलेले काम, योगदान कधीही विसरले जाणार नाही. ते भावी पिढीसाठी प्रेरणादायक ठरणार असल्याचे नमूद केले. मिरामार येथील स्मृतिस्थळी विविध पक्षीय नेत्यांनी पुष्पांजली वाहून भाऊंना आदरांजली वाहिली. त्यात मगो पक्षाचे नेते, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, भाऊंचे कुटुंबीय तसेच इतरांचा सहभाग होता. दिवसभरात गोव्याच्या विविध भागातून आलेल्यांनी आदरांजली वाहिली.

पासपोर्ट रद्द होणार नाही

Advertisement

ज्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द होणार नाही तर त्याऐवजी त्यांना पासपोर्टसंदर्भात सरेंडर प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव आहे. शिवाय ओसीआय कार्डे देऊनही तो विषय सुटू शकतो. त्यासाठी राज्य सरकारतर्फे केंद्राकडे पाठपुरावा आणि प्रयत्न चालू असून तो प्रश्न सुटेल, अशी आशा डॉ. सावंत यांनी वर्तवली.

पोर्तुगीज पासपोर्ट विषयावर तोडगा निघणार

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, पोर्तुगीज पासपोर्ट आणि ओसीआय कार्डचा विषय लवकरच सोडवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विदेश सचिवांकडे दिल्लीत या विषयावर चर्चा करण्यात आली असून त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

Advertisement
Tags :

.