For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

''वस्त्रहरणकार'' गवाणकरांचे कार्य पुढे नेले जाईल: मंगेश मस्के

05:07 PM Nov 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
  वस्त्रहरणकार   गवाणकरांचे कार्य पुढे नेले जाईल  मंगेश मस्के
Advertisement

कुडाळात जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने श्रद्धांजली शोकसभा

Advertisement

कुडाळ । प्रतिनिधी

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना अभिप्रेत असलेली ग्रंथ चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात निश्चितपणे पुढे नेली जाईल. त्यांनी मालवणी भाषेला सातासमुद्रापार सन्मान मिळवून दिला आहे . त्यांचे हे अजरामर कार्य निश्चितपणे पुढे नेले जाईल असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी व्यक्त केले. कुडाळ येथील र. बा. अनंत शिवाजी देसाई वाचनालय येथे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने स्वर्गीय गंगाराम गवाणकर श्रद्धांजली शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गवाणकर यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी वस्त्रहरणकार ,लेखक, नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री मस्के म्हणाले , मालवणी भाषेला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम वस्त्रहरणकार यांनी केले. त्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहतील. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांनी नाटककार गंगाराम गवाणकर यांनी मालवणी भाषा ही किती उंचीचे आहे हे दाखवून दिले. त्यांनी वस्त्रहरण मधून मालवणीची वेगळी ओळख संपूर्ण जगाला करून दिली. त्यांचे साहित्य आणि नाट्य चळवळ मधील काम खरंच आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ,जिल्हा उपाध्यक्ष धाकू तानावडे,संचालक. ॲड संतोष सावंत.,सतीश गावडे ,प्रसाद दळवी ,संजय शिंदे प्रवीण भोगटे, ऋतुजा केळकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.