For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

नेदरलँड्समध्ये तिरंगी टी-20 मालिका मे महिन्यात

06:22 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेदरलँड्समध्ये तिरंगी टी 20 मालिका मे महिन्यात

वृत्तसंस्था/ अॅम्स्टलव्हीन

Advertisement

नेदरलँड्स, आयर्लंड आणि स्कॉटलंड या तीन संघांमध्ये टी-20 तिरंगी क्रिकेट मालिका 18 ते 24 मे दरम्यान अॅम्स्टलव्हीन येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेचे यजमानपद नेदरलँड्सने स्वीकारले आहे. 2 जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीची ही युरोपियन देशातील सरावाची तसेच पूर्वतयारीची तिरंगी टी-20 मालिका आहे. सदर मालिका राऊंडरॉबिन पद्धतीने खेळविली जाणार असून या मालिकेत अंतिम सामना राहणार नाही. प्रत्येक संघ दुसऱ्या संघांबरोबर दोन सामने खेळणार आहे.

या महिन्याच्या प्रारंभी आयर्लंड संघाने अफगाणबरोबर मायदेशात विविध प्रकारातील मालिका खेळल्या होत्या. येत्या मे महिन्यात आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. तत्पूर्वी आयर्लंडचा संघ नेदरलँड्सच्या दौऱ्यावर तिरंगी मालिका खेळणार आहे. या तिरंगी मालिकेत आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड यांचा समावेश राहील. अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंडचा संघ अ गटात असून या गटात कॅनडा, भारत, पाक आणि अमेरिका, ब गटात स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नामिबिया व ओमान तर ड गटात नेदरलँड्स, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका व लंका यांचा समावेश आहे.

Advertisement

तिरंगी टी-20 मालिकेतील पहिला सामना 18 मे रोजी नेदरलँड्स वि. स्कॉटलंड, 19 मे रोजी नेदरलँड्स वि. आयर्लंड, 20 मे आयर्लंड वि. स्कॉटलंड, 22 मे नेदरलँड्स वि. स्कॉटलंड, 23 मे आयर्लंड वि. स्कॉटलंड, 24 मे नेदरलँड्स वि. आयर्लंड.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.