महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनपा आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

06:26 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कचऱ्याची समस्या, कामाबद्दल टाळाटाळ केल्याने धरले धारेवर

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गांधीनगर येथे तसेच काही ठिकाणी कचरा पेटवून देण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांची तसेच आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली. त्यामध्ये पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. केवळ ‘काम करतो’ असे नाटक करू नका तर प्रत्यक्षात कामे करा, असे सुनावले.

गांधीनगर येथे कचरा पेटवून दिल्यानंतर याबद्दल तक्रारी वाढल्या. विविध प्रकल्प राबविण्याची माहिती पर्यावरण साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी अनेकवेळा दिली. मात्र जर प्रकल्प राबविले असतील तर कचरा पेटवून देण्याचा प्रसंग का आला? असे विचारण्यात आले. त्यावर सदर छायाचित्र हे पूर्वीचे असल्याचे सांगून महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांतून आणि कर्मचाऱ्यांतून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

सत्ताधारी गटातील स्थायी समितीच्या काही अध्यक्षांना हाताशी धरून साऱ्यांचीच दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप आता होत आहे. सत्ताधारी गटातीलच काही नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. महापालिका आयुक्तांना गांधीनगर परिसरातील छायाचित्रेही पाठवून देण्यात आली आहेत.

ब्लॅकस्पॉट मोहीम थंडावली

शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. प्रारंभी दररोज दोन ते तीन ठिकाणचे ब्लॅकस्पॉट हटविण्यात आले. मात्र त्यानंतर ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे. महानगरपालिकेतील राजकारण आणि अधिवेशनामुळे ब्लॅकस्पॉटची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. अनेक चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग पडत आहेत. त्यामुळे पुन्हा शहराला कचऱ्याची समस्या भेडसावत आहे.

मनपा आयुक्तांची दिशाभूल

महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र त्यानंतर सदर छायाचित्रे ही पूर्वीची असल्याचे सांगून त्यांची देखील दिशाभूल करण्यात आली आहे. एकूणच शहरामध्ये कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. ते पेटविण्यात येत आहेत. असे प्रकार घडत असताना महापालिका आयुक्तांनाच खोटी माहिती दिली जात आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article