पूरामुळे कोसळले झाड, मुळाखाली सापडले 7 कलश
ब्राझीलच्या जंगलांमध्ये असे काही मिळाले आहे, जे इतिहासाशी संबंधित असून प्राचीन लोकांविषयी माहिती देणारे आहे. येथे पुरामुळे एक वृक्ष कोसळला, त्याच्या मूळांखाली 7 मडकी आढळून आली आहेत. या मडक्यांमध्ये सापडलेली सामग्री ही थक्क करणारी आहे.
अमेझॉनच्या घनदाट जंगलांमध्ये अनपेक्षित पुरातत्व शोधाने एक प्राचीन आणि रहस्यमय संस्कृतीच्या शक्यतांना समोर आणले आहे. हा शोध ब्राझीलच्या फॉन्sट बोआ क्षेत्रात लागला आहे. तेथे मागील महिन्यात पुरामुळे एक झाड कोसळले आणि त्याच्या मूळांखाली काही अजब वस्तू दिसून आल्या. स्थानिक ग्रामस्थांना कोसळलेल्या झाडांच्या मुळांखाली 7 मोठमोठे अस्थी कलश दिसून आले. या कलशांचा व्यास जवळपास 90 सेंटीमीटरपर्यंत होता. हे कलश 40 सेंटीमीटर खोलवर जमिनीत दडलेले होते आणि यात मनुष्यांसोबत मासे आणि कासवांची हाडं मिळाली आहेत.
हा शोध लागो डो कोचिला नावाच्या ठिकाणी लागला असून ते मध्य सोलिमोइन्स क्षेत्रातील एक कृत्रिम बेट आहे. हे बेट प्राचीन माणसांकडून पुरापासून वाचविण्यासाठी तयार केल्याचे मानले जाते. तर प्रकल्पाच्या प्रमुख पुरातत्व तज्ञ जिओर्जिया लेला होलांडा या ममिरुआ इन्स्टीट्यूटशी संबंधित असून त्यांनी या कलशांसंबंधी माहिती दिली आहे. हे कलश बहुधा प्राचीन आवासांखाली दाबलेले होते आणि त्यांना जाणूनबुजून माती आणि सिरॅमिकच्या प्लॅटफॉर्मवर स्थापित करण्यात आले होते, जेणेकरून त्यांच्यावर पुराचा प्रभाव पडू नये. हे कलश अत्यंत मोठे असून यात सिरॅमिकची झाकणं मिळालेली नाहीत. यामुळे त्यांना एखाद्या जैविक पदार्थाने सील करण्यात आले असावे असे संकेत मिळतात, असे होलांडा यांनी सांगितले.
कलशाच्या आता काय होते?
या कलशांमध्ये मिळालेली हाडं याचा वापर मृतदेहांचा अत्यंसंस्कार किंवा धार्मिक विधींसाठी करण्यात आल्याचे संकेत देतात. तसेच मासे आणि कासवांच्या हाडांच्या उपस्थितीतून भोजन आणि जीवनशैलीचा हिस्सा देखील हा शोध आहे. या वस्तू निर्माण करण्यासाठी विविध सिरॅमिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे हा एखादी बहुसांस्कृतिक समाज राहिला असावे असे वाटते, याची माहिती इतिहासात नोंद नाही. या कलशांच्या निर्मितीकरता हिरव्या रंगाच्या मातीचा वापर करण्यात आला होता. ही माती अमेझॉनच्या क्षेत्रात अत्यंत दुर्लभ आहे. हे कलश विशिष्ट काळाच्या विशिष्ट सिरॅमिक परंपरेशी संबंधित आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
हे क्षेत्र कृत्रिम बेट असून ते पूरयुक्त मैदानांवर प्रगत स्वदेशी इंजिनियरिंगने निर्माण करण्यात आले होते. हे तंत्रज्ञान पाहता त्या काळातील लोकसंख्या घनदाट होती आणि भूमी व्यवस्थापनात लोक प्रगत होते असे वक्तव्य संशोधक अमराल यांनी केले.