मान्सूनपूर्व पावसामुळे सोनोली रस्त्यावर झाड कोसळले, शेतकऱ्याचे नुकसान
11:59 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/किणये
Advertisement
तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी दुपारी जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसात बिजगर्णी-सोनोली रस्त्यावर झाड कोसळले होते. त्यामुळे काहीकाळ या संपर्क रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. सोनार्ली बिजगर्णी रस्त्याच्या बाजूला असलेले शेतकऱ्याचे काजूचे झाड कोसळून सदर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारी पश्चिम भागात जोरदार मान्सून पाऊस झाला. पावसामुळे जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला आहे. खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी सदर पाऊस उपयोगी ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र सोनोली रस्त्यावर काजूचे झाड कोसळल्यामुळे पुढील वर्षी सदर शेतकऱ्याला काजूचे उत्पादन त्या झाडापासून मिळणार नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
Advertisement
Advertisement