महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अणुहल्ल्याच्या स्थितीत दोन ठिकाणी उपचार

07:00 AM Aug 19, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका केंद्रात 16 आयसीयू अन् 20 आयसोलेशन समवेत 50 बेड्स : वर्षभरात होणार निर्मिती

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारने भोपाळ वायूगळती सारख्या दुर्घटनेतून धडा घेत लोकांच्या उपचाराच्या दिशेने पाऊल टाकले आहे. देशात पहिल्यांदाच सरकार रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक हल्ले किंवा दुर्घटनेच्या पीडित लोकांच्या उपचारासाठी आधुनिक केंद्र तयार करणार आहे. याचा विस्तृत तपशील अहवाल (डीपीआर) तयार करावा लागणार आहे.

या अहवालाच्या अंतर्गत तामिळनाडूच्या चेन्नईतील स्टॅनली मेडिकल कॉलेज आणि हरियाणाच्या झज्जर एम्समध्ये एक-एक आधुनिक सीबीआरएन सेंटर तयार केले जाणार आहे. दोन्ही सेंटर्ससाठी केंद्र सरकारने 230 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. तामिळनाडू सरकारने सेंटर निर्मितीसाठी डीपीआरला मंजुरी दिली आहे. झज्जरच्या एम्समध्ये सीबीआरएन सेंटरसाठी कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या केंद्रांच्या निर्मितीसाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. हे सेंटर 50 बेड्सचे असेल. तर 16 आयसीयू बेड्स तर 20 आयसोलेशन बेड्स असणार आहेत. 10 बेड्स पोस्ट अन् प्री-ऑपरेशनच्या रुग्णांसाठी असतील. याचबरोबर चार बेड्स बोन मैरो प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांसाठी राखीव असतील.

प्रस्तावित सेंटरमधील 50 टक्के बेड्स कायम रिकामी ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून किरणोत्सर्ग किंवा वायूगळती झाल्यास रुग्णांना त्वरित उपचार मिळू शकतील. कानपूरमधील अमोनिया वायूगळती आणि विशाखापट्टणम एचपीसीएल रिफायनरीतील स्फोटानंतर रुग्णांना उपचारासाठी भटकत रहावे लागत आहे.

संरक्षण मंत्रालयाची मदत

रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी अणि आणि आण्विक केंद्राची निर्मिती आरोग्य मंत्रालय करवित आहे. यात संरक्षण मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जी, भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर, न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पर्यावरण अन् हवामान बदल मंत्रालयाची मदत घेतली जात आहे. सेंटरमध्ये कुठली उपकरणे आणि कशाप्रकारच्या उपचाराची व्यवस्था असायली हवी हे ठरविण्यात येत आहे.

5 राज्यांमधील 7 शहरांची निवड

गुजरात, राजस्थान, झारखंड समवेत 5 राज्यांचय 7 शहरांमध्ये द्वितीय स्तरीय सीबीआरएन सेंटर तयार केले जाईल. याकरता केंद्र सरकारने 140 कोटी रुपये मंजूर केले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबादचे बीजे. मेडिकल कॉलेज, झारखंडच्या रांचीमधील रिम्स, तामिळनाडूतील कन्याकुमारी मेडिकल कॉलेज, चेंगलापट्टूचे मेडिकल कॉलेज, तिरुनलवेली  मेडिकल कॉलेज, राजस्थानच्या कोटाचे मेडिकल कॉलेज आणि उत्तरप्रदेशात अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत हे सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article