टाइल्स लावण्यासाठी खोदत असताना मिळाला खजिना
घराबाहेर नव्या टाइल्स बसविण्यासाठी एक इसम स्वत:च्या बगीच्यात खोदकाम करत होता, काम फारसे अवघड नव्हते, केवळ गवत अन् दगड हटवायचे होते, जवळपास अर्ध्या तासानंतर अवजार जमिनीच्या आत एका गोष्टीला आदळले आणि अजब आवाज आला. प्रथम एखादा लोखंडी तुकडा किंवा तार असेल असे वाटले, परंतु हाताने माती हटविल्यावर एका मागोमाग एक धातूच्या गोष्टी निघू लागल्या. काही वेळानंतर हे भंगार नव्हे तर चांदीचे दागिने, नाणी अन् चांदीच्या छडी असल्याचे स्पष्ट झाले.
जमिनीच्या आत सुमारे 1 हजार वर्षांपासून दाबलेला हा वायकिंग काळातील खजिना होता. यात सुमारे 700 अमूल्य प्राचीन वस्तू आणि तुकडे मिळाले आहेत. सर्व गोष्टी चांदीच्या होत्या. या खजिन्यात चांदीचे एकूण वजन सुमारे 18.5 किलो आहे. या वस्तू हजारो वर्षे जुने असल्याने याचे मूल्य आणखीच वाढते. याला डेन्मार्कचा आतापर्यंतचा सर्वात ज्ञात वायकिंग सिल्वर होर्ड म्हटले जात आहे.
केवळ टाइल्ससाठी खोदली जमीन
हा चकित करणारा शोध डेन्मार्कच्या रीबिल्ड भागात एका घराच्या अंगणात लागला आहे. घराचा मालक नव्या टाइल्स बसवू इच्छित होता, याकरता तो जमीन तयार करत होता. तो केवळ काही तास गवत, दगड हटविणार होता. परंतु सुमारे अर्ध्या तासाच्या खोदकामानंतर त्याला जमिनीत काहीतरी आदळल्याचा आवाज ऐकू आला. इसमाने तेथील माती हटविली असता दागिने, नाणी अन् चांदीच्या छडी त्याच्या हाती लागल्या. आपण डेन्मार्कमधील सर्वात मोठ्या वायकिंग खजिन्याच्या वर उभे आहोत याची कल्पनाही बहुधा त्याला त्यावेळी नसावी.
मातीच्या भांड्यांमध्ये खजिना
पुरातत्वतज्ञांनुसार हा खजिना सुमारे 900 व्या शतकात जमिनीत लपविण्यात आला होता. चांदीचा मोठा हिस्सा एका मातीच्या भांड्यात ठेवण्यात आला होता. सुमारे 320 वस्तू, ज्यांचे वजन जवळपास 6.4 किलो होते, त्याच मूळ मातीच्या भांड्यात मिळाल्या आहेत. उर्वरित सामग्री त्याच्या आसपासच्या मातीत विखुरलेली होती. पूर्ण खजिन्यात सुमारे 700 वस्तू आणि त्यांचे तुकडे सामील आहेत, यात चांदीच्या छडी, कंकण, नाणी, चांदीचे तुकडे आणि थॉरचा छोटा हातोडाही मिळाला आहे. म्हणजेच सुमारे एक हजार वर्षांपूर्वी कुणीतरी स्वत:च्या मोठ्या संपत्तीला जमिनीत लपविले होते आणि मग तो परत तेथे येऊ शकला नव्हता.
अरब अन् इंग्लंडची नाणी
या शोधाचे वैशिष्ट्या केवळ याचे प्रमाण नाही. खजिन्यात अरब जगत आणि अँग्लो-सॅक्सन भागांमधील नाणी मिळाली आहेत. यामुळे वायकिंग काळात डेन्मार्कचा संपर्क अत्यंत दूरवरच्या भागांशी होता हे कळते. त्या काळात चांदी केवळ दागिने निर्माण करण्यासाठी वापरली जात नव्हती. चांदीला वजनाच्या हिशेबाने संपत्ती अन् देयक म्हणूनही वापरले जात होते. याचमुळे खजिन्यात चांदीच्या छडी आणि छोटे तुकडे देखील मिळाले आहेत.
एका छडीवर रहस्यमय रनिक लिपी
खजिन्यात मिळालेल्या एका चांदीच्या छडीने पुरातत्वतज्ञांची उत्सुकता वाढविली आहे. त्यावर काही रुनिक खुणा कोरण्यात आल्या आहेत. संग्रहालयानुसार याला संभाव्यपणे ‘हुतू’ वाचले जाऊ शकते. हे एखाद्या व्यक्तीचे नाव, मालकाची ओळख किंवा इतर महत्त्वपूर्ण खूण असू शकते. परंतु याचा खरा अर्थ अद्याप निश्चित नाही. म्हणजेच एक हजार वर्षे जुना हा खजिना केवळ दौलत नव्हे तर त्या काळातील लोकांचे जीवन आणि व्यापाराविषयीही माहिती देत आहे.
थॉरचा हातोडा
खजिन्यात छोटासा थॉरचा हातोडाही मिळाला असून तो अत्यंत खास आहे. वायकिंग संस्कृतीत थॉर एक प्रमुख देवता होते आणि त्यांचा हातोडा त्यांच्या ओळखीशी निगडित होता. 18.5 किलो चांदी कोणाची होती असा प्रश्न उपस्थित होतो, याचा मालक अत्यंत समृद्ध आणि समाजात प्रतिष्ठित राहिला असावा. एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी असणे त्याच्याकडे दुरपर्यंतचे व्यापारी नेटवर्क राहिले असावे हे सांगते, असे पुरातत्व तज्ञांचे मानणे आहे.