For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाल्टिक समुद्रात मिळाला खजिना

06:31 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाल्टिक समुद्रात मिळाला खजिना
Advertisement

171 वर्षे जुन्या जहाजात मिळाली अमूल्य शॅम्पेन

Advertisement

बाल्टिक सागरात खोलवर बुडालेले 171 वर्षे जुन्या जहाजाचा शोध लावण्यात आला आहे. पोलिश पाणबुड्यांच्या टीमने स्वीडनच्या किनाऱ्यापासून सुमारे 190 फूट खोलवर दीर्घकाळापासून पाण्यात बुडालेल्या जहाजाचे अवशेष शोधले आहेत. शोधपथकाने जहाजावर शॅम्पेन, वाइन, मिनरल वॉटर आणि पोर्सिलेनची सामग्री शोधली आहे.

बाल्टिक समुद्रात बुडालेले जहाज शॅम्पेनच्या बंद बाटल्यांनी भरलेले आहे. हे जहाज 19 व्या शतकातील आहे. पोलिश पाणबुड्यांच्या पथकाने दीर्घकाळापासून पाण्यात बुडालेल्या जहाजात महाग मद्याचा साठा असल्याचे सांगितले. जहाजावर 100 हून अधिक शॅम्पेनच्या बाटल्या आहेत. हे जहाज रशियन जार (राजा)साठी प्रवास करत असावे असे जहाजाला शोधणाऱ्या पोलंडच्या डायव्हिंग ग्रूप बाल्टिटेकचे सदस्य टोमाज स्टॅचुरा यांचे मानणे आहे.

Advertisement

बाल्टिक समुदात सर्वात सक्रीय पाणबुड्यांपैकी आम्ही एक आहोत. आतापर्यंत हजारो अवशेषांची छायाचित्रे आम्ही मिळविली आहेत. परंतु हा शोध अत्यंत वेगळा होता. 40 वर्षांपासून मी सागरात शोध घेत आहे, परंतु इतक्या अधिक प्रमाणात सामग्रीसह अवशेषांचा शोध पहिल्यांदाच लागला आहे. हा जहाजाचा शोध अनेक वर्षांपासून कित्येक जण घेत होते असे स्टॅचुरा यांनी सांगितले आहे.

जहाजाला स्वीडनच्या ओलांद बेटापासून 37 किलोमीटर अंतरावर समुद्रात शोधण्यात आले आहे. अवशेषांमध्ये मिळालेल्या बाटल्यांवर जर्मन कंपनी  सेल्टर्सचे ब्रँड नाव आहे.  बाटल्यांद्वारेच हे जहाज 1850-67 या कालावधीत बुडाले असावे हे स्पष्ट झाले. शॅम्पेन पिण्यायोग्य आहे की नाही हे अद्याप पाहिले गेले नाही. या शॅम्पेनच्या निर्मितीकरता वापरण्यात आलेले पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण होते. मध्य जर्मनीच्या एका खनिज झऱ्यातील पाण्याचा वापर करण्यात आला होता. 800 वर्षांपासून येथील पाणी जगभरात नेण्यात येत असल्याचे स्टॅचुरा यांनी सांगितले.

मातीच्या बाटल्यांवर असलेला ब्रँड जर्मन कंपनी सेल्टर्सचा होता, ही कंपनी आजही उत्पादनक्षेत्रात आहे. संशोधकांनुसार याची किंमत अधिक असल्याने पोलिसांना पहारा द्यावा लागला आहे. शॅम्पेन 1850-67 दरम्यान निर्माण करण्यात आली होती. ज्या बाटलीत ती पॅक करण्यात आली होती, त्यातील नमुने कंपनीकडे आजही उपलब्ध आहेत.  याचमुळे कंपनीशी संपर्क साधण्यात येणार असल्याचे अंडरवॉटर व्हिडिओग्राफर मारेक काकाज यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.