एसटीचा आवडेल तेथे कोठेही प्रवास महागला
कोल्हापूर :
एसटी प्रशासनाने सुमारे 15 टक्के तिकीट दर वाढ केली आहे. याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. नियमित प्रवासासह आता पाससह विविध योजनेतील दरातही वाढ झाली आहे. यामध्ये ‘अवडेल तेथे कोठेही प्रवास’चा पासही महागला आहे. 1 फेब्रुवारी 2025 (31 जानेवारी 2025 मध्यरात्रीपासून ) सुधारित दरानुसार हा पास वितरित केला जाणार आहे.
एसटी महामंडळाने प्रस्तावित केलेला 15 टक्के भाडेवाढीचा प्रस्तावास राज्यशासनाने मंजूर दिली असून कोल्हापुरातील 12 आगारामध्ये 24 जानेवारीच्या रात्री 12 पासून नवीन दरानुसार एसटीने भाडे आकारणी सुरू केली आहे. या नवीन दरानुसार कोल्हापूर-मुंबई तब्बल 90 रूपये तर कोल्हापूर-पुणे 53 रूपयाने तिकीट दरात वाढ झाली आहे. या नियमित बससेवेच्या तिकीट दरासोबत पास, योजनेतील तिकटात सुमोर 10 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये अवडेल तेथे कोठेही प्रवास पासचाही समावेश आहे.
अवडेल तेथे कोठेही प्रवासचे सुधारित पासचे दर
सेवेचा प्रकार 4 दिवसाच्या पास दर 7 दिवसाच्या पासचे दर
प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी बस 1814 910 3171 1588
शिवशाही 2533 1269 4429 2217
ई बस शिवाई 2861 1433 5003 2504