कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्रॅव्हलरची ट्रकला धडक, 15 जणांचा मृत्यू

06:33 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानमध्ये भीषण रस्ते अपघात

Advertisement

वृत्तसंस्था/ जोधपूर

Advertisement

राजस्थानमधील फलोदी जिह्यातील माटोडा पोलीस स्टेशन हद्दीत भारतमाला एक्स्प्रेस-वेवर रविवारी संध्याकाळी उशिरा एक भीषण रस्ते अपघात घडला.  भाविकांना घेऊन जाणारी भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर अचानक पार्क केलेल्या ट्रकला धडकल्यामुळे 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. जोधपूरमधील सुरसागर येथील रहिवासी असलेले 18 जण टेम्पो ट्रॅव्हलरने बिकानेरमधील कोलायत मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले असून त्यांना गंभीर अवस्थेत नजिकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

टेम्पो ट्रॅव्हलरची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुंदन कंवरिया यांनी दिली. सर्व मृत जोधपूरच्या सुरसागर येथील रहिवासी आहेत. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक मृतदेह टेम्पो ट्रॅव्हलरच्या सीट आणि लोखंडात अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि स्थानिकांना संघर्ष करावा लागला. पोलीस, एसडीआरएफ आणि अन्य मदत पथकांनी घटनास्थळी मदत व बचावकार्य केले.

टेम्पो ट्रॅव्हलरचा जास्त वेग आणि कमी दृश्यमानता ही अपघाताची प्राथमिक कारणे असल्याचे मानले जात आहे. चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक कमी दृश्यमानतेमुळे न दिसल्याने ही धडक बसल्याचे सांगण्यात आले. पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच जोधपूरचे पोलीस आयुक्त ओमप्रकाश मथुरादास माथुर एमडीएम रुग्णालयात पोहोचले होते. तेथे त्यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विकास राजपुरोहित यांच्यासह जखमींच्या उपचारांच्या व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. फलोदीचे पोलीस अधीक्षक कुंदन कंवरिया यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी 15 जण ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अपघातात पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तिघांना तातडीने ओसियन रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्यांना ग्रीन कॉरिडॉरने जोधपूरला रेफर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना असल्याचे ट्विट करत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article