For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : गोटखिंडीत विना नंबरप्लेट डंपरमधून मुरुम-खडी वाहतूक

01:55 PM Jan 05, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   गोटखिंडीत विना नंबरप्लेट डंपरमधून मुरुम खडी वाहतूक
Advertisement

                          गोटखिंडी–भडकंबे येथे नंबर प्लेटविना डंपर; नियम धाब्यावर

Advertisement

वाळवा : वाळवा तालुक्यातील गोटखिंडीते भडकंबे गावाच्या मध्यावर संतोषगिरी डोंगरावर खडी क्रेशर आहेत. या ठिकाणी मुरूम उत्खनन चालू आहे. या खडी क्रेशरवर चालणाऱ्या डंपर वाहतूकीस असणाऱ्या काही डंपरगाडयांना पाठीमागील बाजूस नंबर प्लेट नाहीत.

ज्या गाडयांना नंबर प्लेट नाहीत त्या गाड्या शासनाची रॉयल्टी चुकवण्यासाठी वापरल्या जात असल्याची चर्चा आहे.तसेच या गाड्यामध्ये नियम बाह्य पद्धतीने, मर्यादेपेक्षा जास्त माल भरला जातो, त्यामुळे रस्त्यांचे सुद्धा
नुकसान झाले आहे.

Advertisement

अतिवेगाने या गाड्या चालवल्यामुळे नागरिक व चालक यांच्यात वाद होत आहेत. जाणू-नबुजून या गाडयांना नंबर प्लेट बसवलेल्या नाहीत. अशी चर्चा आहे. एखादा अपघात झाला तर नंबर प्लेट नसल्यामुळे पाठीमागून गाडीचा नंबर दिसत नाही. मग जबाबदार धरायचे कुणाला? असा प्रश्न पडतो.

Advertisement
Tags :

.