गरबा खेळायला रूग्णवाहिकेतून मुलींची वाहतूक! नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला प्रकार
कोल्हापुरातील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून मोठ्या संख्येनं तरुण मुली गरबा खेऴायला जात असल्याचा व्हिडियो समोर आला आहे. या व्हिडियोने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
काल रात्री 10 वाजता हॉकी स्टेडियम ते नॉर्थ स्टार हॉस्पिटल परिसरात एका रुग्णवाहिकेने एक चारचाकी आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या रुग्णवाहिकेची पाठलाग करूण थांबवले. रुग्णवाहिकेच्या चालकाला जाब विचारून गाडीमधील पेशंट पहाण्यासाठी दार उघडण्यास सांगितले.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ड्रायव्हरने दार उघडले. त्यानंतर त्या रुग्णवाहीकेत एकही पेशंट नव्हते तर गरबा खेळायला गेलेल्या तरूण मुली असल्याचे आढळून आले. या मुली शासकिय मेडिकल महाविद्यालयाच्या मुली असल्याचे आढळून आले.
याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. असता तर या सर्व विद्यार्थिनी शेंडा पार्क इथल्या महाविद्यालयाच्या इमारतीमध्येच दुर्गा पूजेसाठी गेल्या होत्या. तिकडून परत येत असताना वाहन बिघडल्याने रुग्णवाहिकेतून आणावं लागलं असं स्पष्टीकरण देण्यात आलं. पण अशा पद्धतीने रुग्णवाहीकेतून वाहतूक करणे हा सुद्धा गुन्हाच असल्य़ाचे स्पष्टीकरण आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली असूनयाबाबत अधिष्ठता यांना नोटीस देखील पाठवली जाणार आहे.