For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

स्पेनमध्ये रेल्वे अपघातानंतर परिवहनमंत्र्यांचा राजीनामा

06:46 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेनमध्ये रेल्वे अपघातानंतर परिवहनमंत्र्यांचा राजीनामा
Advertisement

माद्रिदमध्ये झालेल्या दुर्घटनेत 69 जणांचा मृत्यू; सहा दिवसांनंतर निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था, माद्रिद

स्पेनचे परिवहनमंत्री ऑस्कर पुएंते यांनी पदाचा राजीनामा जाहीर केला. माद्रिदच्या दक्षिणेकडे झालेल्या हाय-स्पीड रेल्वे अपघातात 69 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सहा दिवसांनी त्यांनी हा निर्णय घेतला. या दुर्घटनेनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. चालू वर्षातील स्पेनमधील हा दुसरा मोठा रेल्वे अपघात होता.

Advertisement

संसदेत बोलताना पुएंते म्हणाले, “एका वर्षापेक्षा कमी काळात दोन अपघात झाल्यानंतर स्पेनसारख्या देशाचा परिवहनमंत्री पदावर कसा राहू शकतो? हा राजकीय प्रतिष्ठा, नैतिकता आणि पीडितांप्रती संवेदनशीलतेचा प्रŽ आहे. 28 ऑक्टोबरला हा अपघात झाला. ऊळांवर उभ्या असलेल्या दुसऱ्या रेल्वेला एका हाय-स्पीड टेनने धडक दिली. माद्रिद-सेव्हिल मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेली संचार प्रणाली बंद पडल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक दावा आहे. माद्रिदमधील केंद्रीय नियंत्रण कक्षातून एका टेनला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली; मात्र तिच्या पुढे दुसरी टेन उभी होती. याच मार्गावर जानेवारीतही मोठा अपघात झाला होता. दक्षिणेकडे जाणारी एक टेन ऊळावरून घसरून विऊद्ध दिशेने येणाऱ्या टेनला धडकली होती. त्यात 46 जणांचा मृत्यू झाला. त्या अपघाताची चौकशी अद्याप सुरू आहे.

स्पेनचे हाय-स्पीड रेल्वे जाळे देशाच्या महत्त्वाच्या उपलब्धतेपैकी एक मानले जाते. चीननंतर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जाळे आहे. तीन दशकांहून अधिक काळापूर्वी सेवा सुरू झाल्यापासून या वर्षाच्या सुऊवातीपर्यंत येथे जीवितहानी करणारा अपघात झाला नव्हता.

Advertisement
Tags :

.