For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परिवहनच्या बसला अपघात

06:18 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
परिवहनच्या बसला अपघात
Advertisement

तिघे गंभीर जखमी, नियंत्रण सुटल्याने घडली घटना

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

चालकाचे नियंत्रण सुटून परिवहन मंडळाची बस रस्त्याशेजारील शेतात घुसल्याने पाचहून अधिक प्रवासी जखमी झाले. शनिवारी पहाटे चचडीजवळील तेनिकोळ्ळ क्रॉसनजीक ही घटना घडली आहे. यापैकी तिघा जखमींना बेळगावला हलविण्यात आले आहे.

Advertisement

प्रियांका नायक (वय 24), आशा के. बी. (वय 42) दोघीही रा. म्हैसूर, सायबण्णा सोमनिंग शिरशाळ (वय 55), रा. बल्लोळी, ता. इंडी, जि. विजापूर अशी जखमींची नावे आहेत. या अपघातातील जखमींना सुरुवातीला बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात हलविण्यात आले होते. तिघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री मुरगोड पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून हलकी क्रॉस ते चचडीला जाताना तेनिकोळ्ळ क्रॉसनजीक ही घटना घडली आहे. बस रस्त्याशेजारी शेतामध्ये घुसल्याने हा अपघात घडला. अपघातग्रस्त बस बसवकल्याणहून बेळगावकडे येत होती.

Advertisement
Tags :

.