For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

04:53 PM Jul 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
Advertisement

सिंधुदुर्ग । प्रतिनिधी

Advertisement

तर नव्याने चार जणांना सिंधुदुर्गात नियुक्ती

पोलीस दलातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन निःशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर इतर जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये याच जिल्ह्यात सेवा करून बदली झालेल्या निरीक्षकांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये ठाणे ग्रामीण येथून मारुती जगताप तर रायगड येथून भरत धुमाळ, प्रदीप पोवार आणि राजेंद्र पाटील यांचा समावेश आहे. तर सिंधुदुर्गातून रिजवाना नदाफ व उदय झावरे यांची रायगड येथे तर तानाजी नारनवर यांची ठाणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.