महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंटचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण निश्चित

10:48 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संरक्षण मंत्रालय सचिवांच्या बैठकीत शिक्कामोर्तब 

Advertisement

बेळगाव : बेळगावसह दक्षिण विभागातील 16 कॅन्टोन्मेंट बोर्डचे जवळच्या महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याचे अखेर निश्चित करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखाली 25 जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये मार्गदर्शक तत्त्वांबाबत चर्चा करण्यात आली. कोणत्या मालमत्ता केंद्र सरकारकडे राहतील व कोणत्या मालमत्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्या जातील, यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याने बेळगाव कॅन्टोन्मेंटचे लवकरच महानगरपालिकेत हस्तांतरण होईल, हे निश्चित झाले आहे.

Advertisement

संरक्षण मंत्रालयाचे सचिव ए. गिरीधर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 25 जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये संबंधित राज्य सरकारांचे प्रतिनिधी सहभागी झाले. बेळगावसह अहमदनगर, अजमेर, छत्रपती संभाजीनगर, बबिना, कन्नूर, देवळाली, कामठी, खडकी, मोरार, नरीसाबाद, पुणे, सागर, सिकंदराबाद यासह सर्व 16 कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सीईओंना जवळच्या महानगरपालिकेमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हस्तांतरण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

शुक्रवार दि. 28 रोजी संरक्षण मंत्रालयाचे पत्र कॅन्टोन्मेंट बोर्डला मिळाले आहे. मिलिटरी एरिया वगळता इतर सर्व मालमत्ता विनाखर्च महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये पायाभूत सुविधा मिळविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या पत्रामध्ये मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करण्यात आली आहेत. मालमत्ता हस्तांतरित करताना काही मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारकडेच ठेवला जाणार असून उर्वरित मालमत्ता स्थानिक प्रशासनाकडे म्हणजेच महानगरपालिकेकडे दिल्या जाणार आहेत.

25 जून रोजी संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांची बैठक

दोन महिन्यांपूर्वी कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार व अध्यक्ष बिग्रेडियर जॉयदीप मुखर्जी हे दिल्ली येथे झालेल्या संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत हस्तांतरणाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर आता 25 जून रोजी संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांची बैठक घेऊन हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ होण्यासंबंधी चर्चा केली. त्यामुळे लवकरच बेळगावसह इतर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article