Cultural Kolhapur: गुलालाच्या उधळणीत 'पी ढबाक घुमायला लागतं', आषाढ पाण्याची कहाणी
देवळाला पाच प्रदक्षिणा घालून नदीच पाणी देवीच्या पायरीवर ओतल जातं
By : प्रसन्न मालेकर
कोल्हापूर : आषाढी एकादशी झाली की कोल्हापूर कराना वेध लागतात ते त्र्यंबुलीच्या आषाढ पाण्याचे. आषाढ महिन्याचा दुसरा पंधरवडा म्हणजे एव्हाना पावसाची दोन नक्षत्र उलटून गेलेली असतात. पंचगंगा लालबुंद होऊन वाहत असते. गल्लीत मिटिंग भरते एकादशी, संकष्टी नसलेल्या मंगळवार शुक्रवारचा दिवस धरला जातो.
मंडळाच्या बोर्डावर वर्गणीची नोटिस लागते. यात्रेच्या आदल्या रात्रीच गल्लीत पी ढबाक वाजायला लागत. पी ढबाक म्हणजे सुंद्री ( बारकी सनई ) आणि डफ. पहाटे पहाटे तरूण कार्यकर्ते नदीवर जातात. कावडी भरून पाणी आणतात. इकडं गल्लीच्या कोपऱ्यावर टेंबला मरगाईच्या आणि म्हसोबाच्या नावाने दगडाला शेंदूर लागतो आणि कापूर लावून बकऱ्याचा बळी दिला जातो.
सकाळ उजाडायच्या आत त्याचे वाटे वर्गणी देणाऱ्या घरात पोच होतात. एखाद्या घरात सार्वजनिक नैवेद्य शिजतो. आंबिल(कढी) वडी भाकरी भाजी एक पालेभाजी शक्यतो मेथी आणि एक फळ भाजी विशेषत: वांगी दही भात असा नैवेद्य सजतो.
कवारणींचे मळवट भरले जातात. सजवलेल्या मातीच्या मोग्यात नदीचं आणलेलं पाणी भरतात. हा कार्यक्रम तरूण कार्यकर्त्यांचा पण मार्गदर्शन असत ते ज्येष्ठ महिलांच. परातीत दहीभात घुगऱ्या कालवल्या जातात. गुलालाच्या उधळणीत पी ढबाक घुमायला लागतं आणि गल्लीच्या सीमावर भात शिंपडत कापूर लावत धूप घालत ही मिरवणूक त्र्यंबलीपर्यंत पोहचते.
देवळाला पाच प्रदक्षिणा घालून नदीच पाणी देवीच्या पायरीवर ओतल जातं, नैवेद्य गाभाऱ्यात जातो. आठवणीन बक-याच मस्तक(मुंडी) पाय ठेवले जातात. घराघरात वाट्याच यात्रेच्या आदल्या रात्रीच गल्लीत पी ढबाक वाजायला लागत. पी ढबाक म्हणजे सुंद्री ( बारकी सनई ) आणि डफ. पहाटे पहाटे तरूण कार्यकर्ते नदीवर जातात. कावडी भरून पाणी आणतात.
इकडं गल्लीच्या कोपऱ्यावर टेंबला मरगाईच्या आणि म्हसोबाच्या नावाने दगडाला शेंदूर लागतो आणि कापूर लावून बकऱ्याचा बळी दिला जातो. सकाळ उजाडायच्या आत त्याचे वाटे वर्गणी देणाऱ्या घरात पोच होतात. एखाद्या घरात सार्वजनिक नैवेद्य शिजतो. आंबिल(कढी) वडी भाकरी भाजी एक पालेभाजी शक्यतो मेथी आणि एक फळ भाजी विशेषत: वांगी दही भात असा नैवेद्य सजतो.
कवारणींचे मळवट भरले जातात. सजवलेल्या मातीच्या मोग्यात नदीचं आय्णलेलं पाणी भरतात. हा कार्यक्रम तरूण कार्यकर्त्यांचा पण मार्गदर्शन असत ते ज्येष्ठ महिलांच. परातीत दहीभात घुगऱ्या कालवल्या जातात. गुलालाच्या उधळणीत पी ढबाक घुमायला लागतं आणि गल्लीच्या सीमावर भात शिंपडत कापूर लावत धूप घालत ही मिरवणूक त्र्यंबुलीपर्यंत पोहचते.
देवळाला पाच प्रदक्षिणा घालून नदीच पाणी देवीच्या पायरीवर ओतल जातं, नैवेद्य गाभाऱ्यात जातो. आठवणीन बक-याच मस्तक(मुंडी) पाय ठेवले जातात. घराघरात वाट्याच मटण शिजत आणि जत्रा संपन्न होते. हा झाला विधी. हा विधी आहे कृतज्ञतेचा आणि प्रार्थनेचा. कृतज्ञता नवं पाणी दिल्याबद्दल आणि प्रार्थना. या पुढही अय्संच रक्षण करावं म्हणून.
टेंबलाबाई कोल्हापूरची रक्षक देवता तीनं आपलं अखंड रक्षण करावं. हा बली घेऊन तृप्त व्हावं. (देवी असून बळी का घेते याचा करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख आहे की कामाक्ष दैत्याने महालक्ष्मीसह सर्व देवांना बकऱ्याच रूप दिले होते. त्र्यंबुलीने कामाक्षाला शाप दिला की एक कल्पपर्यंत तुझं सगळं कुळ बकरं म्हणून जन्माला येईल आणि तुझा बळी घेऊ) मरगाई म्हणजे महाकाली.
तीने पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून रक्षण करावं, नदीचं नवीन पाणी कृतज्ञता म्हणून सर्व देवांना अर्पण करायचा हा सोहळा. कदाचित पावसा मुळ उंदीर घुशी अन्नाच्या शोधात घरात शिरतात. उंदिर मरून पुन्हा साथीचे रोग पसरतात यालाच मरिआईचा फेरा म्हणत असावेत. अशा दृष्टादृष्ट संकटापासून भगवतीनं रक्षण कराव यासाठी पूजण्याचा हा सण. दरवर्षी प्रमाणं असाच उत्साहात साजरा करूया पण पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि परंपरागत पद्धतीने.