For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशद्रोह्यांचा कर्दनकाळ !

06:42 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशद्रोह्यांचा कर्दनकाळ
Advertisement

स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत हा देश माझे कुटुंब आहे. मी त्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे. असे त्यागमय आणि सकारात्मक आयुष्य देशसेवेसाठी अर्पण करणारे अतुलचंद्र कुलकर्णी यांची नुकतीच महाराष्ट्र अॅडमिस्ट्रेटीव्ह ट्रिब्युनलवर (मॅट) नियुक्ती करण्यात आली आहे. देशद्रोह्यांचा कर्दनकाळसह अनेक बिरुदावली मिळविणाऱ्या कुलकर्णी यांच्यासमोर आता नवीन आव्हाने असणार आहेत.

Advertisement

देशाचे अखंडत्व अबाधित ठेवण्यासाठी अनेक शुर-विरांनी बलिदान दिले आहे. देशावरचे संकट म्हणजे माझ्या घरावरील संकट असल्याची भावना मनात ठेवत ते संकट मुळापासून नष्ट करण्याचे काम भारतीय संरक्षण दलाच्या तिन्ही दलांनी तर केलेच मात्र देशांतर्गत काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनीदेखील यामध्ये सिंहाची भूमिका बजावली. यातीलच एक अधिकारी म्हणजे सेवानिवृत्त झालेले अतुलचंद्र कुलकर्णी होय. केंद्र आणि राज्यातील तपास यंत्रणांमध्ये काम करीत असताना देशद्रोह्यांचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख बनली आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच केंद्र सरकारने त्यांची राज्याच्या मॅटवर नियुक्ती केली.

भलेही केंद्र सरकारने त्यांची मॅटवर नियुक्ती केली असली तरी त्यांचा पिंड हा  देशद्रोह्यांचा कर्दनकाळ असाच असणार आहे. भारतीय पोलीस सेवेतील 1990 च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते राज्यात नियुक्त झाले. यावेळी राज्यातील अनेक ठिकाणी तसेच मुंबईत काम केल्यानंतर त्यांची 2000 साली इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (आयबी) नियुक्ती झाली. याठिकाणी त्यांनी 13 वर्षे दिल्ली तसेच इशान्येकडील राज्यात काम करीत देशाची मान उंचावली. आयबीमध्ये अनेक मोहिमांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या सर्व मोहिमा त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. यादरम्यान, कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष करीत  देशच माझे कुटुंब असल्याचा वसा घेत त्यांनी देशासाठी अनेक बाबींचा त्याग केला. अखेर 2013 साली ते पुन्हा राज्यात दाखल झाले. पोलीस महासंचालक कार्यालयात आस्थापना विभागाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची 2015 साली मुंबई क्राईम ब्रँचच्या सह-पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. याच काळात त्यांनी अनेक गुन्हेगार-दहशतवाद्यांच्या नाकीनऊ आणले. अंडरवर्ल्डचा म्हातारा

Advertisement

डॉन दाऊद इब्राहीमकडून फुटुन निघालेल्या छोटा राजनने मुंबईत धुमाकुळ घातला होता.  अशातच छोटा राजन याच्या इंडोने]िशयातील बाली येथे मुसक्या आवळण्यात आल्या. यावेळी छोटा राजनवर मुंबईत अनेक गुन्हे दाखल असल्याने, त्याला मुंबईत आणण्याची तयारी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सुऊ केली होती. मात्र राजनला असलेला धोका पाहता, केंद्र सरकार तसेच देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित  डोवाल यांनी राजनची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात केली. मात्र त्यातूनही छोटा राजनची थेट गुह्यात असलेली अनेक प्रकरणे कुलकर्णी यांनी न्यायालयात दाखल केली. त्यावर अद्यापही सुनावणी सुऊ आहेत. याचे सर्व श्रेय हे अतुलचंद्र कुलकर्णी यांचे आहे. देश तसेच राज्याच्या सेवेसाठी स्वत:च्या जीवाची देखील पर्वा न करणाऱ्या कुलकर्णी यांच्यासमोर क्राईम ब्रँचमध्ये असताना मोठे आव्हान होते. एकीकडे संघटीत गुन्हेगारी, अंडरवर्ल्डच्या कारवाया तर त्याचदरम्यान नायजेरीयन ड्रग्ज तस्करांचा वाढलेला उपदव्याप. नायजेरीयन ड्रग्ज तस्करांनी मुंबईच्या आस-पास म्हणजे नालासोपारापासून ते मिरा रोडपर्यंत आपले बस्तान बसविले होते. तर दुसरीकडे दक्षिण मुंबईतील मस्जिद रोड आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या रेल्वे पटऱ्या त्यांचे अ•s बनले होते. हे ड्रग्ज तस्कर कोणालाच भीक घालत नव्हते. तर त्यांच्या रांगड्या शरीरयष्टीकडे पाहता, एका तस्कराला पकडण्यासाठी किमान दोन ते तीन पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असे. ड्रग्जची डोकेदुखी म्हणजे मुंबई व्यसनांच्या आहारी घालण्यासारखी आहे. यामुळे याकडे वेळीच लक्ष देण्यासाठी नायजेरीयन तस्करांचा नायनाट करण्यासाठी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मोहिम आखली.

संपूर्ण क्राईम ब्रँच त्यांनी मस्जिद बंदर ते सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर दरम्यान, रेल्वे पटरीवर उतरविले. यावेळी पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा दिली. क्राईम ब्रँचने या तस्करांना पकडण्यासाठी हालचालींना सुऊवात केली. मात्र संख्येने असंख्य असलेल्या नायजेरियन तस्करांनी पोलिसांवरच हल्ला चढविला. तसेच काही दगड त्यांनी रेल्वे पटरी नजीक असलेल्या वस्तीवर देखील मारण्यास सुऊवात केली. यामुळे काही काळ येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान, जखमी अवस्थेत देखील पोलिसांनी काही नायजेरियन नागरिकांना पकडले. तर काही पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र या कारवाईमुळे नायजेरीयन तस्करांनी एकच धसका घेतला. हळुहळू मुंबईतील नायजेरीयन ड्रग्ज तस्करांनी येथून काढता पाय घेतला. हे सर्व काही सुऊ असतानाच अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मनात 26/11 हल्याची एक सल टोचत होती. मुंबईत येऊन येथे रेकी कऊन दहशतवादी हल्ला घडविला गेल्याने, कोणताही देशभक्त अधिकारी थोडेच गप्प बसणार होता. तसेच अतुलचंद्र कुलकर्णी देखील शांत नव्हते. या हल्यासाठी रेकी करणाऱ्या डेव्हीड हेडलीला अमेरिकन एफबीआयने अटक केली होती. मात्र तो देशाचा गुन्हेगार असल्याने, त्याची भारतीय त्यातल्या त्यात मुंबईच्या न्यायालयात जबाब नोंदवित त्याला देशाच्या स्वाधिन केले पाहिजे, हा त्यांचा अट्टहास होता. त्यानुसार त्यांनी अमेरिका वाऱ्या करण्यास सुऊवात केली. येथील सरकार तसेच तपास यंत्रणांना आपला मुद्दा पटवून सांगत त्यांनी डेव्हीड हेडलीचा मुंबईतील न्यायालयात जबाब नोंदविला. सर्व जगाने हेडलीचा जबाब प्रसारमाध्यमांच्या साह्याने पाहिला. हे सर्वात मोठे यश अतुलचंद्र कुलकर्णी यांचे होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी झाली. याठिकाणी त्यांनी आयएस या दहशतवाद्यांचे कंबरडे तर मोडलेच, मात्र ब्रेनवॉश झालेल्या कित्येक तरूणांचे त्यांनी आयुष्य वाचविले. कुलकर्णी यांची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर  त्यांनी एटीएसमध्ये असताना ज्या पद्धतीने देशद्रोह्यांच्या मुसक्या आवळल्या, अगदी त्याच प्रकारे त्यांनी एनआयएमध्ये कर्तव्य बजावत असताना अनेक दहशतवाद्यांना सळो की पळो कऊन सोडले. अखेर पोलीस दलातून ते सेवा निवृत्त झाले. मात्र त्यांचे कर्तव्य आणि प्रामाणिक निष्ठा पाहुन त्यांना मॅटवर नियुक्त करण्यात आले आहे. याठिकाणी देखील ते त्यांच्या कर्तव्याची छाप पाडणार हे नक्की..

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.