For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रायच्या नव्या नियमांमुळे स्पॅम कॉल्सना लागणार कडक निर्बंध

06:16 AM Feb 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
ट्रायच्या नव्या नियमांमुळे स्पॅम कॉल्सना लागणार कडक निर्बंध
Advertisement

दूरसंचार कंपन्या काळजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अनावश्यक कॉल्स आणि मेसेजेसना आळा घालण्यासाठी नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. आता स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसच्या खोट्या रिपोर्टिंगसाठी दूरसंचार कंपन्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. ट्रायने स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस ओळखण्यासाठी डेटा विश्लेषण करण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत, कंपन्यांना कॉल आणि मेसेज पॅटर्न, जास्त कॉलिंग अॅक्टिव्हिटी, कॉलचा कमी कालावधी आणि आउटगोइंग कॉल्स आणि इनकमिंग कॉल्सच्या संख्येतील असंतुलन यासारख्या ट्रॅकिंग अॅक्टिव्हिटीजचे निरीक्षण करावे लागेल. या नवीन प्रणालीमुळे, स्पॅमर्सना जलद ओळखता येईल आणि ग्राहकांना असे नकोसे कॉल आणि संदेशांपासून दिलासा मिळेल.

Advertisement

स्पॅमकॉल-संदेशांबद्दल तक्रार करणे आता सोपे झाले आहे. आता टेलिमार्केटिंग आणि स्पॅम कॉल-संदेशांमुळे त्रासलेल्या लोकांना दिलासा मिळेल. ट्रायने नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना डू नॉट डिस्टर्ब अॅपद्वारे 7 दिवसांच्या आत स्पॅम कॉल किंवा संदेशांबद्दल तक्रारी नोंदवता येतील.

5 दिवसांच्या आत तक्रारींवर कारवाई

नवीन नियमांनुसार, टेलिकॉम कंपन्यांना नोंदणीकृत नसलेले कॉल किंवा संदेश पाठवणाऱ्यांविरुद्ध 5 दिवसांच्या आत कारवाई करावी लागेल. याव्यतिरिक्त, आता प्रत्येक प्रमोशनल मेसेजमध्ये स्पष्ट ऑप्ट-आउट पर्याय प्रदान करणे आवश्यक असेल, जेणेकरून वापरकर्ते असे संदेश प्राप्त करू इच्छितात की नाही हे स्वत: ठरवू शकतील.

काय होणार कारवाई

?  एखाद्या कंपनीने पहिल्यांदाच नियमाचे उल्लंघन केले तर 2 लाख दंड होणार

?  दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास दंडाची रक्कम 5 लाखांपर्यंत वाढणार

?  आणि गुन्हेगारांना 10 लाखांपर्यंत दंड आकारला जाईल.

?  जर एखाद्या टेलिकॉम ऑपरेटरने वारंवार नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्या सेवा देखील निलंबित केल्या जाऊ शकतात.

10-अंकी नंबरवरून प्रमोशनल कॉल केले जाणार नाहीत

ट्रायने टेलिमार्केटिंग कॉलवरही कडक कारवाई केली आहे. प्रमोशनल कॉल आता सामान्य 10-अंकी मोबाइल नंबरवरून करता येणार नाहीत. त्याऐवजी

प्रमोशनल कॉल 140 मालिकेतील नंबरवरून केले जातील. 1600 मालिकेतील क्रमांक व्यवहार आणि सेवांशी संबंधित कॉल हाताळतील. संदेश देखील ओळखला जाईल.

ट्रायची पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन मानक हेडर कोड लागू केलेत:

? प्रचारात्मक संदेशात     झ् असेल.

? सेवेशी संबंधित संदेशात              ए राहील.

? व्यवहार संदेशांमध्ये     ऊ असेल.

? सरकारी संदेशांसाठी     उ वापरला जाईल.

Advertisement
Tags :

.