For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना नव्या कायद्यांचे प्रशिक्षण

11:02 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना नव्या कायद्यांचे प्रशिक्षण
Advertisement

बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सेवा बजावणाऱ्या 800 हून अधिक अधिकारी व पोलिसांना नव्या गुन्हेगारी कायद्यांविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी रविवारी ही माहिती दिली. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली नव्या कायद्यांविषयी पोलिसांना मार्गदर्शन केले जात आहे. म्हैसूर येथील केपीए व बेळगाव येथील आर. एल. लॉ कॉलेजच्या सहकार्याने दि. 18 व 23 मे रोजी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. म्हैसूर येथील जेएसएस कॉलेजचे निवृत्त प्राचार्य सुरेश व अॅड. सावंत यांनी नव्या कायद्यांविषयी अधिकारी व पोलिसांना मार्गदर्शन केले. आतापर्यंत 800 जणांना प्रशिक्षण देण्यात आले असून अशा कार्यशाळा यापुढे चालणार आहेत, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.