For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवली येथील शेतकऱ्यांना '' श्री '' भात पीक लागवडीचे प्रशिक्षण

02:57 PM Jul 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
देवली येथील शेतकऱ्यांना    श्री    भात पीक लागवडीचे प्रशिक्षण
Advertisement

वेंगुर्ले । प्रतिनिधी

Advertisement

वेंगुर्ले तालुक्यातील देवली येथील श्री रघुवीर विष्णू तळाशीलकर यांच्या प्रक्षेत्रावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्या वतीने UNDP GCF अंतर्गत भात पीक "श्री " पद्धत लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवर तसेच शेतकऱ्यांचे स्वागत करून प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत असताना "श्री" भात पीक पद्धतीने लागवड तसेच गट निर्मिती करून शेती केल्याने उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न नक्कीच वाढून शेतकरी संपन्न होईल अशी ग्वाही मंडळ कृषी अधिकारी मालवण श्री अमोल करंदीकर यांनी दिली.तांत्रिक मार्गदर्शन करत असताना उपकृषी अधिकारी मालवण श्री धनंजय गावडे यांनी भात पीक चटई रोपवाटिका,"श्री" लावणी पद्धत याविषयी मार्गदर्शन केले.दरम्यान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले श्री आनंद रावले, प्रगतशील शेतकरी कट्टा गुरामवाडी यांनी स्वअनुभवातून करत असलेल्या श्री भात पीक पद्धतीचे फायदे उपस्थितांना सांगितले. देवली येथील प्रगतशील शेतकरी श्री सुदर्शन नाईक यांनी देखील उपस्थितांसमोर आपले मनोगत मांडलेदेवली गावचे सरपंच श्री.शामसुंदर वाक्कर यांनी आपले मनोगत मांडताना कृषी विभागाच्या योजणांचा तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून गावातील सर्व शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात प्रगती करावी व गाव शेती संपन्न होण्याकरिता युवा शेतकऱ्यांनी देखील प्रयत्नशील असले पाहिजे असे सांगितले.यावेळी सदरील कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी मालवण श्री अमोल करंदीकर, उपकृषी अधिकारी मालवण श्री धनंजय गावडे, देवली गावचे सरपंच श्री शामसुंदर वाक्कर,ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन मालवणकर,कट्टा गुरामवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री आनंद रावले,UNDP प्रकल्प सहयोगी श्री आशिष जाधव, पीकविमा प्रतिनिधी श्री प्राणिल नार्वेकर, कृषी सेवक देवली श्री किशोर कदम, देवली येथील प्रगतशील शेतकरी श्री सुदर्शन नाईक, श्री गुरुनाथ पाटकर,सखी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. निकिता चव्हाण तसेच देवली गवाणवाडी मधील सर्व शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.